बुलढाणा (BNU न्यूज)- बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजीत बुलढाणा ऑयडॉल स्पर्धेत गोपाल गावंडे विजेता ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत तृप्ती डोंगरे व गोपाल गावंडे यांच्यामध्ये अटी-तटीचे सादरीकरण झाले. स्पर्धेत विजेत्याची निवड करतांना निरीक्षकांना सुध्दा बराचवेळ विचार करुन शेवटी गोपाल गावंडे यांच्या नावावर आखीर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपविजेतेपद तृप्ती डोंगरे ठरल्या तर तृतीय क्रमांक महेंद्र रूपनारायण यांनी पटकाविला.
गणेशोत्सव सुरू होताच बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात बुलढाणा आयडॉल ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेकरीता पाचही जिल्ह्यातून अनेक युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. गणेश उत्सवाच्या दहा दिवसापर्यंत विविध टप्प्यात ही स्पर्धा घेण्यात आली. सेमी फायनलमध्ये तब्बल १९ स्पर्धक पात्र ठरले होते. या १९ स्पर्धकांना अंतिम सामन्यासाठी बुलढाणा येथील बुलडाणा अर्बनच्या ऑडिटोरियम हॉल येथे आमंत्रीत करण्यात आले होते. या ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात विविध फेरीत परिक्षकांनी गायकास चाळणी लावली. पहिल्या फेरीमध्ये असलेले १९ स्पर्धकाला पैकी दुस-या फेरीत १२ पात्र गायकांची निवड करण्यात आली. तिस-या फेरीमध्ये केवळ १० गायक उरले होते. एकूण १० गायकांना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कलागुणांचा प्रदर्शन केले. दर्जेदार संगीताची साथ, गायकांचा आवाज व सादरीकरण यामुळे खचाखच भरलेल्या हॉलमध्ये मोठा उत्साह दिसून आला. गायकांनी एकापेक्षा एक सरस हिंदी व मराठी गाणे तसेच भावगीत सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. सादरीकरण करणारा गायक हा तेवढेच ताकदीचा असल्याने रसिक वर्गात प्रचंड उत्साह दिसून आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, बुलढाणा शहर ठाणेदार काटकर, तिरुपती मंदीराचे अध्यक्ष अरुण दिवटे, पत्रकार राजेंद्र काळे, नितीन शिरसाट, राजेश डिडोळकर, रणजीत राजपूत, इसरार देशमुख, अरुण जैन, समाधान चिंचोले तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन चंद्रशेखर जोशी व गजानन धांडे यांनी केले.
प्रत्येक गाण्याला मिळाल्या जोरदार टाळ्या..
प्रत्येक गाण्यावर जोरदार टाळ्यांचा पाऊसच जणूकाही या ठिकाणी होत असल्याने आयडॉल कोणाला निवडावे, अशी अडचण निर्माण झाली होती. परंतु परिक्षकांनी लावलेल्या नियम आणि चाचणीत अखेर गोपाल गावंडे यांची वर्णी लागली. तर प्रोत्साहन पर पुरस्कारासाठी तनुश्री भालेराव, प्रज्ञा धांडे, अनुराधा धोरण, अविनाश नावकर, भगवान बाभुळकर, शब्बीर बेग, स्वप्नील आराख इत्यादींना पुरस्कार वितरीत करण्यात आला.सांस्कृतिक कला मंदीराचा अविष्कार ठरला आकर्षणाचे केंद्र..
सांस्कृतिक कला मंदीर अकोला येथील कलाकार तृप्ती दिनकर यांनी यावेळी नृत्य सादर करीत जोरदार टाळया मिळविल्या तर अनंत देशपांडे यांनी गायलेले लता मंगेशकर यांचे राम लखन या चित्रपट बडा दूख दिया तेरे लखनने या गाण्याने कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेले. या गाण्याला रसिकाने प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या शेवटी देखील अनंताभाऊ देशपांडे यांच्या गाण्याची चर्चा अनेकांच्या तोंडी दिसून आली.