रुईखेड मायंबा येथे बेरोजगार तरुणाची आत्महत्या

157

बुलढाणा (BNU न्यूज)- बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे बावीस वर्षीय बेरोजगार युवकाने गणपती मिरवणुकीतून आल्यावर 9 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान स्वत:च्या गुरांच्या गोठ्यात आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मृतक तरुणाचे नाव दिपक गंजीधर सोनवणे असे आहे.

धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या रुईखेड मायंबा ता.बुलडाणा येथील रहिवाशी दिपक सोनवणे हा दूग्ध व्यवसायाचा धंदा करीत होता. त्याच्याकडे आठ ते दहा गाई असून तो दूग्ध व्यवसाय करुन आई-वडिलांना मदत करीत होता. दिपक सोनवणे याला बोलता येत नसून ऐकू सुध्दा येत नव्हते. तो मूकबधीर सुध्दा होता. त्याने 9 सप्टेंबरच्या रात्री गणपती विसर्जन मिरणुकीतून आल्यानंतर अचानकपणे गुरांच्या गोठ्यात जावून आत्महत्या केली. त्याला बेरोजगारीने आई-वडिलांपासून हिरावून घेतले. दिपककडे तीन ते चार एकर शेती आहे.