असा कसा..साखर कारखाना? कर्मचाऱ्यांना तीन-चार महिने मिळतच नाही पगार!!

620

संजय देशमुख..
मासरुळ(BNU न्यूज) येथून जवळच असलेला अनुराधा साखर कारखाना 14 वर्षाच्या वनवासानंतर पैनगंगा नावाने गेल्या वर्षी सुरू झाला, त्यात 80 टक्के अशिक्षितांचा अधिकाऱ्यासह भरणा झाला आहे. कारखान्यात कामगारांना तीन-चार महिने पगार मिळत त्यातच जीव धोक्यात घालून कामे करावे लागत असल्याची ओरड होत आहे. एका विशिष्ट समाजालाच प्राधान्य दिल्या जात असल्याचे बोलल्या जाते.
कारखान्याला संपूर्ण बाजूने गळती लागली आहे. कारखान्यावरील टीनपत्रे फुटलेले आहे, अशा दयनीय अवस्थेत कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहे. त्यात त्या कर्मचाऱ्यांना 3-3, 4-4 महिने महिने पगार होत नाही. पगाराची अनियमिता सुरुवातीपासूनच आहे 80 ते 90 हजार टन ऊसाचे गाळप झाले तरी कर्मचारी उपाशीच? याच कारखान्यातून कोट्यावधी रुपयांची साखर व मळी विकले गेले आहे. तरीसुद्धा येथील कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. सतत सतत रडग्राहाणी घेऊन चालत असलेल्या कारखानाची दयनीय अवस्था पाहून या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याची हिंमत केली ऊस लागवडीतून शेतकऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. येथील कारखान्यावरील ज्या मजूर व कर्मचाऱ्यांचे पोट सर्वस्वी मजूरीवर आहे, असे कर्मचारी महिन्याकाठी 5 ते 7 दिवस शेतमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. पुन्हा कारखान्यावर कामाला रुजू होतात. या कारखान्यावर एका विशिष्ट समाजाला प्राधान्य दिले जाते व इतर समाजावर दुजाभाव केल्या जातो, बऱ्याच मजूर कामगारांवर जास्त काम कमी पगार, कमी काम जास्त पगार असे चित्र सुध्दा पाहावयास मिळत आहे. येथील अधिकारी हे नाममात्र असून कारभार वेगळेच लोक सांभाळत असल्याची चर्चा आहे. या भोंगळ कारभाराकडे शासनाने लक्ष देवून कर्मचाऱ्यांवर होत असलेली उपासमार दूर करण्याची मागणी होत आहे.