अदिती अर्बनची सामाजिक बांधिलकी.. मासरूळ धाड सर्कलसाठी स्वर्गरथ उभा करणार-सुरेश देवकर

268

संजय देशमुख..
मासरुळ(BNUन्यूज) मासरुळ व धाड सर्कलसाठी दोन मोठे निर्णय घेवून या परिसरासाठी स्वर्गरथ देवून कुठल्याही प्रकारचे भाडे किंवा डिझेल घेतले न घेता स्वर्गरथाच्या माध्यमातून वैकुंठधाम जाण्याची मोफत सेवा दिल्या जाणार असल्याची माहिती अदिती अर्बन क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश देवकर यांनी बोलतांना व्यक्त केली.

धामणगाव येथे गीताई ज्ञानपीठच्या इमारतीमध्ये २५ सप्टेंबर रोजी अदिती अर्बन सोसायटीच्या वार्षीक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सुरेश देवकर बोलत होते. पुढे बोलतांना देवकर यांनी पुढील आमसभेमध्ये मोफत अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी परिसर व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या संपर्कात असून ज्या गावातील कोणी अपंग तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील मुले व मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बोर्डेताई, पायघन, तुषार पाटील, दिगंबर जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कार्यकारी संचालक चिंचोले यांनी केले. सरव्यवस्थापक शैलेंद्र मुळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक स्थिती विषयी माहिती दिली. संचालन व्यवस्थापक राजू वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन पंकज शेजोळे यांनी केले.