पैश्यामुळे राजकीय समीकरण बदलणार..! मासरुळ जि.प.सर्कलमध्ये धनशक्ती विरुध्द जनशक्ती राहणार??

592

राजकीय वार्तापत्र
संजय देशमुख, मो.नं.९६८९७९१०९८

मासरुळ (BNU न्यूज) बुलढाणा जिल्ह्यातील मासरुळ जिल्हा परिषद सर्कलवर संपूर्ण जिल्ह्याची नजर असते. कारणही तेवढेच मोठे आहे, या सर्कलमधून निवडणूक लढविणारे सर्व दिग्गज असतात. या जि.प.सर्कलमध्ये एकूण २१ गावे आहेत. महाविकास आघाडी सरकारने या जिल्हा परिषद मधील दोन्ही पंचायत समितीची उलथा पालत करून टाकली होती. त्यातील पाच गावे कमी करून एका नविन गावाचा समावेश केला होत, परंतु पुन्हा शिंदे सरकारने ‘जैसे थे ठेवून’ या जिल्हा परिषद सर्कलमध्ये महाविकास आघाडी सरकारने सर्वसाधारण महिला आरक्षण काढले आहे ते पुन्हा सर्वसाधारण पुरुष होते की काय, असा संभ्रम उमेदवारांसह जनतेत पडला आहे. यामुळे मासरुळ जिल्हा परिषद सर्वâलचे राजकीय समिकरण बदलणार, धनशक्ती विरुध्द जनशक्ती धनलाभा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुकीचे राजकीय समिकरण बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात निवडणुका म्हटल्यावर इच्छूक उमेदवार व मतदारांमध्ये एक नवचैतन्य पाहायला मिळते प्रत्येक जण आपआपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या इच्छूक उमेदवारांचा प्रचार करतात मात्र आता राजकारणाला वेगळे वळण घेतल्या ने जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी होणार आणि भाजपशी लढा देणार, परंतु ही महाविकास आघाडी मासरूळ व धाड जि.प.सर्कलमध्ये टिकणे कठीण आहे. महाविकास आघाडी झाली तरी या दोन्ही मतदार संघात आघाडीत असलेले तीनही पक्षांचे उमेदवार निवडणूक लढणार आहे.

माजी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या या आघाडीवर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे महाविकास ची आघाडी झाली तर बिघाडी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होणार, असे चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे. मासरूळ जि.प. सर्कलमध्ये २१ गावांचा समावेश आहे. सर्वसाधारण महिला राखीव पंचायत समिती गण आरक्षण एक, सर्वसाधारण तर दुसरे एस.सी.राखीव जाहीर झाल्याने ही निवडणूक फार मोठी संघर्षाची ठरणार असल्याने या निवडणुकीमध्ये गेल्या तीन वर्षापासून तर काही पाच वर्षापासून कार्यकत्र्यांना सांभाळताना दिसत आहे. मोर्चे, आंदोलन किर्तने, शिबिर, रक्तदान, अन्नदान असे अनेक कार्यक्रम या सर्कलमध्ये राबवितांना दिसत आहे. यासाठी उमेदवारांनी आतापासून गोडधोड चालविली आहे. मासरूळ सर्कलची निवडणूक लढविण्यासाठी मासरूळ, तरारखेड, सोयगाव, जामठी, सातगाव, धामणगाव या गावातून इच्छूक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते. त्यामध्ये काही उमेदवार सर्वांच्या ओळखीचे आहे तर काही नवीन चेहरे दिसून येणार आहेत. आता होणारी निवडणूक नेत्यांना चांगली जड जाणार आहे, कारण अगोदरच नेते मंडळी निवडणूक संपल्यानंतर मतदारांना विसरून जातात. या जिल्हा परिषद सर्कलमध्ये अल्पसंख्यांक यांची मते मात्र निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे आता उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जिंकण्याठी मतदारांपुढे धन लाभाचा प्रचार व प्रसाद वाटप करण्यावर जास्त जोर राहणार असल्याने सर्व सामान्य जनतेच्या निवडणुका केंव्हा होणार? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.