बुलढाणा तालुक्यातील घटना; ज्युलीने दाखविला मार्ग; काही तासातच आरोपी जेरबंद!
विजय तायडे..
बुलढाणा(BNUन्यूज) सध्या वैज्ञानिक यूग चालू आहे, मानवाने मंगळापर्यंत मजल मारीत मानव मंगळावर घरे बांधण्याच्या तयारीत आहे. जादूटोणा, करणी कवटा, मुठ मारणे, अंगात येणे अशा खुळ्या कल्पनांना वाव नाही. परंतु काही लोक या खुळ्या कल्पनांना थारा देत विपरीत घडवून आणतात. अशीच मन सुन्न करणारी एक घटना धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या चांडोळ येथे घडली. भाऊ, भावजयी व भाच्यांनी 60 वर्षीय महिलेला भानामतीच्या संशयावरुन खल्लासच केले. धाड पोलिसांनी मारेकऱ्यांना काही तासातच पकडून जेरबंद केले आहे.
धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या चांडोळ येथील 60 वर्षीय महिला धनाबाई सुभाष गोमलाडू यांचे प्रेत 28 सप्टेंबरच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास आढळून आले होते. महिलेच्या अंगावर साडी नसल्याने मर्डर झाल्याची चर्चा होती आणि त्या चर्चेला आज 29 सप्टेंबर सबुत पुराव्यासहीत पोचपावती मिळाली आहे. महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घेवून आरोपींना जेरबंद करणे हे बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम व धाड पोस्टे .ठाणेदार अनिल पाटील यांच्यासमोर होते, पोलिसांनी ज्युली नावाच्या डॉग स्कॉटने दाखविलेले रक्ताचे डाग व साडीवरुन मारेकऱ्यांचा शोध लावल्याने काही तासातच मृतक धनाबाई गोमलाडू यांच्या खून करणारा आरोपी भाऊ हिरालाल रतनसिंग बलावणे, गोपीबाई हिरालाल बलावणे, संजय हिरालाल बलावणे व रंजीत हिरालाल बलावणे या चारही आरोपींना अटक करण्यात आली. गेंदुसिंग भाऊलाल पाकळ यांच्या फिर्यादीवरुन धाड पोस्टे.ला उपरोक्त आरोपींवर भादंवीचे कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी सचिन कदम व ठाणेदार अनिल पाटील, पो.उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो.सचिन पाटील करीत आहे.
असा आहे घटनाक्रम..
धनाबाई गोमलाडू यांचे शेत पासोडी-चांडोळ रस्त्यावर मराठवाडा सिमेवर शेत आहे. धनाबाई 28 सप्टेंबर रोजी शेतामध्ये गेल्या होत्या, परंतु त्या महिला सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात तसेच आजु-बाजुच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा त्यांना रात्री 8.30 वाजता शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत त्या महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले. मृतक धनाबाई यांचे कपाळ चपलेले तसेच अंगावरची साडी सुद्धा गायब होती. सदर घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेचा कोणीतरी अज्ञातांनी खून केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील हे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.पोलिसांनी महिलेचे प्रेत विहिरीच्यावर काढल्यावर पंचनामा केला होता.
भानामतीच्या संशयावरुन प्रकरण घडले..
मारेकऱ्यांचे बयाण सुध्दा घटनेप्रमाणे मनाला सुन्न करणारे आहे. मारेकरी म्हणतात धनाबाई यांनी मारेकऱ्यांच्या तरुण मुलास भानामती करुन मारल्याने बदला घेण्यासाठी येथे सख्या भावाने त्यांच्या कुटुंबीयातील आणखी तिघांनी बहिणीचा खून केल्याच्या घटनेने चांडोळसह संपूर्ण जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
ज्युलीने शोधली लपविलेली साडी..
बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळाला भेट देवून डॉग स्कॉट पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी ज्युली नावाच्या डॉग स्कॉटने झाडावरील पडलेल्या खुनाच्या डागावरून मृतक धनाबाई यांची मारेकऱ्यांनी लपवलेली साडी शोधून काढल्याने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.