काटी येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू; पशुपालकाचे 40 हजाराचे नुकसान !!

473

लंपी आजार वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण
नांदूरा(BNUन्यूज) लंपी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले असून लंपीच्या संसर्गाने जनावरांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. नांदूरा तालुक्यातील काटी येथील शेतकरी सचिन रामराव जंगले यांच्या 2 वर्षाचा गोऱ्हांची 29 सप्टेंबर रोजी लंपी आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सचिन जंगले यांच्या गोऱ्हाला लंपीची लागण झाल्याने गोऱ्ह्यावर डॉक्टरांनी उपचार केले होते, परंतु उपचाराचा कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही. अखेर 29 सप्टेंबर रोजी लंपी आजाराने त्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू झाला. त्यांचे 40 हजाराचे नुकसान झाले. वडनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ.डी.बी.राठोड यांनी घटनास्थळाला भेट देवून सदर गोऱ्ह्याचा पंचानामा करुन गोरा हा लंपी आजाराने मृत घोषीत केले. इतरही 3 ते 4 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याने काटीस आजूबाजूच्या पशुपालंकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लंपी आजाराने जनावरांचे मृत्यू होत असल्याने पशुपालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकरी व पशुपालक मालकांना शासनस्तरावरुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. काटी येथे वाळ्याची फवारणी करण्याची मागणी होत आहे.