पंचनामा न करता वनअधिका-यांनी दिला गाईला वाघापुढे टाकण्याचा सल्ला!!
मोताळा (BNU न्यूज)-प्रत्येक ठिकाणी शेतक-यांनाच वेठीस धरले जात आहे, असाच प्रकार मोताळा तालुक्यातील मोताळा परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातंर्गत असलेल्या रोहिणखेड गावात घडला. शेतक-याची गाय वाघाने फाडली, त्यावेळी शेतक-याने वनरक्षकाला फोन केला असता १ ऑक्टोबर शनिवार, २ ऑक्टोबर रविवार सुट्टी असल्याने सोमवारी येवून पंचानामा करण्याचे वनरक्षकाने सांगितले. वनपालाचा तर फोनच लागला नसल्याने शेतकरी पुत्राने मोताळा वनपरिक्षेत्र अधिका-यांना फोन केला असता, त्यांनी फाडलेली गाय वाघापुढे टाका, म्हणजे तो ती खावून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा करणार नसल्याने सल्ला दिल्याने रोहिणखेडसह परिसरातील शेतकरी वनविभागाचा निषेध व्यक्त करीत आहे.
बुलढाणा न्यूज अपडेट प्रतिनिधीने शेतकरी भिका अप्पा बोंद्रे यांच्याशी १ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता संपर्वâ केला असता, शेतकरी भिका आप्पा बोंद्रे म्हणाले, ३० सप्टेंबरची रात्रीची १०.३० वाजेची वेळ होती. कुत्री भुंकत होती, १५ ते २० नागरिकांना भिका आप्पा बोंद्रे यांच्या वाड्याजवळ जावून पाहिले असता, वाघाने फाडलेली गाय पडलेली होती. सदर घटनेची माहिती देण्यासाठी शेतक-याने वनरक्षक शिरसाट यांना फोन केला असता ते म्हणाले, आता रात्रीचे १०.३० वाजले शनिवार व रविवार सुट्टी असल्याने सोमवारी येवून पंचानामा करु, असे सांगितले. यावर शेतक-याने साहेब तुम्ही सोमवारी पंचनामा कसा कराल, असे विचारले असता मी बरोबर करतो, असे सांगितले. तर वनपाल जगताप यांचा फोन बंद असल्याने भिका आप्पा बोंद्रे यांच्या मुलाने मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी आता रात्रीची वेळ आहे, तुम्ही सदर फाडलेल्या गाईला वाघापुढे टाका म्हणजे वाघ गाईला खावून निघून जाईल, असा अजब सल्ला देवून वनरक्षक व वनपालाची पाठराखण केली. वास्तविक पाहता वनविभागाच्या प्रादेशिक विभागात कर्तव्यावर असणारे अधिकारी हे क्षत्रिय कर्मचारी असल्याने त्यांना मुख्यालयी हजर राहणे गरजेचे असतांना देखील वनपाल व वनरक्षक हे दोघेही मुख्यालयी हजर नव्हते, हे विशेष!
रात्रीची वेळ असल्याचे कारणे देवून घटनास्थळी हजर न होणारे अधिकारी रात्रीच्यावेळी लाकडांचा ट्रक किंवा डीसीएम पकडले तर त्यावेळी १२ ते १ वाजता घटनास्थळी पोहचतात, ते कश्यासाठी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहे. सदर वाघ 1 ऑक्टोबरच्या सकाळी 4 वाजता व्यायम करणाऱ्या युवकांना मुर्ती शिवाराकडे जातांना दिसल्याची चर्चा आहे.
३० सप्टेंबरच्या रात्री वाघाने गाईवर केला होता हल्ला..
मोताळा वनपरिक्षेतातंर्गत असलेल्या रोहिणखेड येथे गावाशेजारी असलेल्या भिका आप्पा बोंद्रे यांच्या गोठ्यातील गाईवार शुक्रवार ३० सप्टेंबरच्या रात्री १०.३० वाजता वाघाने गाईवर हल्ला केला होता, या हल्ल्यामध्ये गाईला ठार मारले. शेतकरी भिका आप्पा बोंद्रे यांनी नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोन केला असता वनपालाचा फोन लागला नाही तर वनरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आम्ही रात्री येवू शकत नाही, तुम्हाला वाघ इजा पोहचविल यासाठी मारलेल्या गाईला वाघापुढे टाकण्याचा अजब सल्ला दिल्याचे शेतकरी भिका आप्पा बोंदे यांनी १ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.