जंगलाचे रक्षकच जंगल विकायला निघाले; मोताळा वनपरिक्षेत्रातील भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर! साहेब…न्याय द्या, जंगल वाचवा; रोहिणखेड येथील शेतकऱ्यांची अमरावती आयुक्तांच्या कोर्टात धाव !!

383

बुलढाणा (BNUन्यूज) मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत असलेल्या रोहिणखेड येथील वनविभागाच्या गट नं.297 मध्ये ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढून अतिक्रमण धारकांना अभय देणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोहिणखेड येथील 15 शेतकऱ्यांच्या वतीने Adv.व्ही. एम. पाटील बुलडाणा यांच्यावतीने अमरावती विभागीय आयुक्त (महसूल) अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे.

मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत असलेल्या गट नं.297 मध्ये वनविभागाच्या जमिनीवर 2010 ते 2011 मध्ये अनेकांनी वृक्षतोड करुन बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले होते. काहींनी अतिक्रमण केलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परत 2014 मध्ये अतिक्रमण धारकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण करुन पुन्हा अतिक्रमण केले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षण बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते, त्यावेळी लेखी आश्वासन देवून शेतकऱ्यांचे उपोषण सोडविण्यात आले होते. तेंव्हापासून मार्च 2022 पर्यंत वनविभागाच्या जागेत जंगल निर्माण झाले होते. परंतु मोताळा वनविभागाच्या सदर वनजमिनीवर मोताळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाण घेवाणीमुळे अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा त्रास होत आहे, सदर अतिक्रमण काढून अतिक्रमण धारकांना अभय देणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

जंगलाचे रक्षकच भक्षक झाले..
वनविभागाच्या जंगलामध्ये सन 2022 मध्ये वनविभागाचे जागेत कुरण विकास योजनेतंर्गत सुमारे 50 हेक्टर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करुन ट्रॅक्टरद्वारे 5 फुट अंतरावर चर तयार करण्यात आले. यामध्ये लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता, हे विशेष!

या शेतकऱ्यांनी मागीतली आयुक्तांकडे न्यायाची दाद..
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे, सदर अतिक्रमण काढून अतिक्रमण करणाऱ्यास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई मागणी मो.फारुख, मो.फारुख ख्याजा, शिवानंद राजस, इरफान यासीन दिवाण, गजानन सोनुने, अबुबकर सिध्दीक मो.अय्युब, मो.रफीक मो युसुफ, मो.रईस मो.रफीक, मो.फारुख मुसा कुरेशी, मो.अन्सार मो.निजाम, मो.युसुफ महेबुब, मधूकर कचोरे, अर्जुन कचोरे, ज्ञानेश्वर कचोरे, राजु चोपडे रोहिणखेड या शेतकऱ्यांच्यावतीने Adv..व्ही.एम.पाटील यांनी विभागीय आयुक्त (महसूल) अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे.

(फोटो सौजन्य-इंटरनेटवरुन)