नांदुऱ्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

329

नांदुरा(BNUन्यूज) येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना 5 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजता घडली, मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन नांदुरा पोस्टे.ला आरोपीविरुध्द 6 ऑक्टोबर रोजी भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने नांदुरा पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मुली
5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अंबादेवी गडावरील देवीचे दर्शन घेवून येतो, असे सांगून घरुन गेल्या होत्या. त्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास एक मुलगी आली दुसरी का आली नाही, असे त्यांनी त्यांच्या मुलीला विचारले असता दिदी मला अंबादेवी गडावर गेलो असता माझे डोके दुखू लागल्याने घरी जावून गोळी घेवून झोपून जाते, असे सांगून रात्री वाजेच्या 8 वाजता निघून गेल्याचे सांगितले. मुलीचा अंबादेवी गड व नांदुरा शहरामध्ये इतरत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. मुलीला संतोष भगवान वानखडे याने कोठेतरी पळून घेवून गेल्याचा संशय व्यक्त केल्याने नांदुरा पोस्टे.ला आरोपीविरुध्द भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा पोलिस पुढील तपास करीत आहे. (कार्टून फोटो-इंटरनेटवरुन)