चिखली पोलिसांनी 65 हजाराचा गुटखा पकडला जिल्हाभरात गुटख्याची सर्रास विक्री; मोजकीच होते कारवाई!

149

चिखली(BNUन्यूज)जिल्हाभरात गुटख्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभार व पोलिसाच्या आर्थिक देवाण-घेवाणीमुळे सुरु असल्याची चर्चा आहे. असे असतांना चिखली पोलिसांनी मात्र गुप्त माहितीच्या आधारे 40 हजार 385 रुपयांच्या गुटख्यासह 25 हजाराची मोटार सायकल असा एकूण 65385 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई आज 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास केली आहे.

शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व इतर गुंगी आणणारे पदार्थ हे विक्री करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी मोटार सायकलने घेवून जात आहे. अश्या माहितीवरुन सफो.शशिकांत धारकरी, पोहेका.निवृत्ती चेके,,पोना.युवराज राठोड,पोका.उमेश राजपुत, पोका.राहुल पायघन यांनी शिंदी हराळी फाटा येथे नाकाबंदी केली असता त्यांना एक मोटार सायकलवर येणारा किरण तुकाराम मोरे (वय 38) रा.संभाजीनगर,चिखली हा इसम मोटार सायकलवर दोन्ही बाजुला कापडाच्या थैल्या आडकवून त्यामध्ये काहीतरी घेवून येतांना दिसला. पोलिसांनी त्या आरोपीची पंचा समक्ष तपासणी केली असता, त्यांना मोटार सायकलरवरील कापडांचे थैल्यामध्ये शासन प्रतिबंधीत गुटखा बाळगून असल्याची खात्री झाल्याने त्याच्या थैल्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधीत केलेला प्रिमीयम नजर 9000 गुटखा 32 पुडे किंमत 6400 रुपये, विमल पान मसाला 11800 रुपये, तंबाखु 21 पुडे प्रत्येकी किेमत 735 रुपये, एक्स एल तंबाखु 67 पुढे किेमत 3350 रुपये, राज निवास पान मसाला 50 पुडे 10500 रुपये, एक हिरो पॅशन प्रो कंपनी मोटार सायकल क्रमांक MH28 AY-3830 किेमत 25 हजार, इतर 300 व नगदी 7300 रुपये असा एकूण 65385-रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली पोस्टे. ला पोना.रंजित हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी किरण तुकाराम मोरे याच्यावर भादवी कलम 328, 188, 272, 273 सहकलम 26(2)(i),26(2)(iv), 26(2)(v), 27(2)(e),30 (2) (9),3,59.अन्न सुरक्षा व मानके अधिनीयम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

मोजक्याचा गुटखा माफीयावर होते कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक गल्ली-बोळात गुटख्याची मोठ्या प्रमाणात अवैद्य विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन व पोलिसांच्या मोकळीकमुळे कारवाई होत नसल्याने जिल्ह्यात गुटख्याच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. यातील काही चिल्लर मोजक्याच आरोपींवर कारवाई होते, मात्र खरे गलेगठ्ठ गुटखा माफीयावर कृपादृष्टी होत असल्याचे ते मात्र कारवाईपासून कोसे मैल दूर असल्याची चर्चा असून त्यांच्यावर सुध्दा कारवाई होणे गरजेचे आहे.(फोटो संग्रहीत सौजन्य-इंटरनेटवरुन)