मोताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग वाढतोय! 2 दिवसात 6 जनावरे दगावले; शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान

313

मोताळा(BNUन्यूज) जिल्ह्यासह मेताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरा-ढोरांना लसीकरण करुन सुध्दा जनावरे लंपीच्या संसर्गाने मरत असल्याने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोताळा तालुक्यात आतापर्यत जवळपास 58 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. यामध्ये केवळ दोन दिवसात जवळपास 6 जनावरे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामध्ये टाकळी (वाघजाळ) येथील 2 बैल, मोताळ्यात 2 बैल व एक गाय तर चिंचपूर येथील एका गायीचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखाच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे.

पशुवै्कीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्यात 25 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात आतापर्यत जवळपास 58 जनावरांचा लंपीच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद असून त्याला मोताळा पशुवैद्यकीय विभागाने दुजोरा दिला आहे. जनावरांच्या वाढत्या मृत्यूने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व 6 ऑक्टोबर रोजी टाकळी येथील महादेव शेनफड शिराळ यांचे दोन बैल लंपीच्या संसर्गाने दगावले आहेत. यामुळे महादेव शिराळ यांचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच डॉ.धिरज सोनटक्के यांनी घटनास्थळी जनावरांचे पोस्टमार्टम करुन लंपीच्या संसर्गाने जनावरे दगावल्याची नोंद केली आहे. यावेळी पोलिस पाटील सुरेंद्र शिराळ, हनुमंत शिराळ, राजेंद्र शिराळ, प्रशांत शिराळ व शेतकरी महादेव शिराळ उपस्थित होते. तर मोताळा येथील गणेश पाचपोर यांचा 1 बैल, किशोर रुमाले यांची 1 गाय, प्रमोद धुनके 1 बैल तर गजानन मापारी चिंचपूर यांची 1 गाय लंपीच्या संसर्गाने दगाविली यामुळे त्याचे दिड लाखाचे नुकसान झाले आहे. सदर पशुपालकांना मोताळा नगर सेवक गणेश पाटील यांनी भेट देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सदर जनावरांवर शासकीय उपचार सुरु होते परंतु ते जनावरे वाचू शकली नाहीत. लंपी संसर्गामुळे जनावरांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्योन शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन स्तरावरुन पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

एकाच डॉक्टरकडे पंधरा गावे..
पशुवैद्यकीय विभागात परिचर व ड्रेसर हे दोन यासह तिन असे पाच पदे रिक्त आहेत. तर डॉ.धिरज सोनटक्के यांच्याकडे मोताळा तालुक्यातील खरबडी, वरुड, वाघजाळ, टाकळी, शिरवा, मोताळा, अंत्री, वडगाव, पुन्हई, रिधोरा, परडा, वारुळी, आडविहीर, तिघ्रा, बोराखेडी एवढी गावे आहेत. डॉ.सोनटक्के यांना पशुपालकांनी रात्री-अपरात्री फोन केला तरी ते वेळीच धावून येत असल्याने डॉ.सोनटक्के यांचे पशुपालकांकडून कौतूक होत आहे.