अल्पवयीन मुलगी शौच्याला गेली अन् त्याने कारमध्ये टाकून पळवून नेली!

314

लोणार तालुक्यातील घटना; आरोपीवर 363 चा गुन्हा दाखल!!

लोणार(BNU न्यूज)सध्या जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक घटना लोणार तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. येथे आरोपीने 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी शौच्यालयाला गेली असता तिला पळवून नेल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली. आरोपीचे नाव कार्तिक गणेश बोडखे असून त्याच्यावर लोणार पोस्टे.ला कलम 363 सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुलीच्या वडिलांनी लोणार पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते कुटुंबीयासोबत शेतामध्ये राहतात. काम करत असतांना त्यांना 11 ऑक्टोबरच्या दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास घाम आल्याने त्यांनी 15 वर्षीय मुलीला पलंगावर बसल्यानंतर पंखा सुरु करण्याचे सांगितले. त्यावेळी मुलीने शौच्याला जातो असे सांगून गेली, दरम्यान थोड्या वेळात त्यांना एका नंबरवरुन फोन आला व पप्पा काळजी करु नका मी आहे. परत येते म्हणाली व फोन बंद केला म्हणून फिर्यादी मुलीचे वडील घाबरलो काय झाले असेल समजून घरातून बाहेर येवून मुलीला शेतात व रोडने पाहू लागलो असता माहित झाल की कार्तिक गणेश बोडखे हा पांढऱ्या रंगाचे चारचाकी गाडीत हात धरुन ओढत गाडीत बसून लोणारकडे घेउन गेल्याचे माहीत झाल्याने शोध घेतला परंतु त्यावेळी त्यांना एका इसमाने कार्तिक गणेश बोडखे तुमच्या मुलीला पुण्याला घेवून जात असल्याचे सांगल्याने कार्तिकचा नंबर लावला तर तो बंद करायचा कधी चालू करायचा, तो औरंगाबादला 11 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजता मुलीसह सापडला. फिर्यादी मुलीला घेवून गावाकडे आले, परंतु आरोपी कार्तिक बोडखे हा गावाकडे न येता तो लोणार येथे उतरला व माझ्या गाडीने येईल असे सांगून निघून गेला.

12 ऑक्टोबर रोजी मुलीने ती शौच्याला गेली असता असता रोडवरच मला कार्तिक गणेश बोडखे भेटला माझा हात धरुन मला माझ्यासोबत चाल म्हणाला, मी विरोध केला असता हाताला धरुन मला ओढत रोडच्या बाजुला उभी असलेल्या पांढऱ्या चारचाकी गाडीमध्ये मला बळजबरी नेत मुकाट्याने बस नाहीतर तुझ्या जिवाचे काही बरेवाईट करीन, असे म्हणून धमकी देत लोणरकडे गाडीचा ड्रायव्हर जोरात गाडी चालवत मला घेवून जात होते किन्ही गावाजवळ मी त्याला माझे बापाला फोन करु दे म्हणाले, त्याने मला फोन दिला व वडीलांना फोन केला होता त्यानंतर त्याने फोन बंद केला फोन येत पण तो उचलत नव्हता रस्त्याने मला आपण पुण्याला जावू मी तुझे सोबत लग्न करतो मी कंपनीत जाइल तू घरी राह बोलत होता त्याने मला तुझे मामाला फोन करुन सांगितल तुला पळून आनले लग्न करतो सांगितले म्हणाला व मला नगर पर्यंत नेले तेथून परत औरंगाबादला आणल्याचे सांगितले, बळजबरीने माझे मुलीस लग्नाचे अमीष देउन गाडीत जबरदस्तीने बसवून पळून नेल्याच्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन आरोपी कार्तिक गणेश बोडखे याच्यावर लोणार पोस्टे.ला भादंवीचे कलम 363, 366, 506 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सपोनी.शरद अहेर हे करीत आहेत.

दोघांनी अल्पवयीन मुलीला पळविले!
मलकापूर तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला दोघांनी तोंडाला रुमाल बांधून गाडीवर बसवून पळवून नेल्याच्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोस्टे.ला दोन अज्ञात आरोपीविरुध्द 363 चा गुन्हा दखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या कुटुंबीयासोबत मलकापूर तालुक्यातील एका गावात कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या मुलीचे 12वीचे शिक्षण दाताळा येथे झाले असून ती सध्या घरीच राहत होती. मुलगा हा शिक्षण घेतो. 12 ऑक्टोबरच रात्री 12.30 वाजेच्या सुमारासत सर्वजण घरामध्ये झोपलेले असतांना त्यांची 16वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बाथरूम करिता उठून बाहेर आली. फिर्यादी सुध्दा तिच्या मागे बाहेर आल्या होत्या, दरम्यान मुलगी ट्रक्टरच्या मागे उभी असतांना दोन मुले एका मोटार सायकलवर तोंडाला पांढरा रंगाचे रूमाल बांधून आलेले मुलीजवळ थांबले व त्यातील एकजण मोटार सायकलवरून खाली उतरला व फिर्यादीची मुलगी ही गाडीवर बसली, त्यांना आवाज देत असतांना ते दोघे मुलीला गाडीवर बसवून घेवून गेले. त्या दोन्ही मुलांनी तोंडाला पांढरा रंगाचे रूमाल बांधलेला असल्याने ते ओळखायला आले नसल्याचे म्हटले असून मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादी म्हटले आहे. उपरोक्त फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोस्टे.ला दोन अज्ञात आरोपीविरुध्द अप.क्र.001/2022 अन्वये भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.