शहीद कैलास पवार यांच्या स्मारकावर एक-एक दिवा लावून केले अभिवादन!

377

संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज) रक्त सांडले देशासाठी, दीप लावूया त्यांच्यासाठी, वदे दिवाळी शहीद पुत्रा
एक दिवा हा तुझ्याचसाठी..! या कवी प्रितमकुमार मिसाळ यांनी लिहिलेल्या ओळींना अनुसरून चिखली येथे शहीद कैलास भारत पवार यांच्या स्मारकावर सोमवार 24 ऑक्टोबर रोजी समस्त चिखलीकर यांच्या वतीने दिवाळीच्या संध्याकाळी एक- एक दिवा लावून शहिदांच्या प्रती असलेले प्रेम आणि समर्पण यांना अभिवादन केले.

कार्यक्रमप्रसंगी सर्वप्रथम वीर पिता भारत पवार, वीर माता उज्वला पवार, बंधू अक्षय आणि भगीणी पूजा यांनी शहिदाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन एक दिवा प्रज्वलित केला. यानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पुष्पचक्र अर्पण करून एक दिवा प्रज्वलित केला. तर सैन्य दलातर्फे मानवंदना देवून एक दिवा प्रज्वलित करण्यात आला. याप्रसंगी प्रमोद पाटील, किशोर कदम, कर्नल विनोद गवई, सैनिक कल्याण अधिकारी पडघान, योगेश आप्पा मंगरूळकर, बाळू भिसे, यशवंत शिनगारे, सुनील सुरडकर, अर्जुन बोर्डे, शाहीर दिलीप गवई, विजय मलवार, सुरेश अवसरमोल, मोहम्मदसाहेब, संजय पवार, अरुण मोरे, संजय कापसे, दत्ता सुसर, ओंकार कासारे, संजय कासारे, पत्रकार संजय निकाळजे, मनोज दाभाडे, संतोष जाधव, प्रशांत डोंगरदिवे, राजू कस्तुरे, हर्ष निकाळजे, संघदीप डोंगरदिवे तसेच शहीद कैलास भारत पवार यांचे मित्र मंडळ व माता भगिनी यांची उपस्थिती होती.

एस. एस. गवईसर यांनी शहिदाप्रती असलेली भावना आपल्या शब्दात व्यक्त केली. प्रत्येक जवानाच्या कार्याला उजाळा देऊन एकेक दिवा प्रत्येकाने प्रज्वलित केला पाहिजे आणि या स्मारकाच्या निमित्ताने या प्रत्येक जवानाला या ठिकाणी ही दिव्यांजली सर्व सामाजिक क्षेत्रातून उपस्थित केली जात आहे, असे प्रतिपादन यावेळेस त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितमकुमार मिसाळ यांनी तर आभार प्रदर्शन किशोर कदम यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.