राष्ट्रवादीतील नाराजीमुळे घाटाखाली उध्दव ठाकरे शिवसेनेला ‘अच्छे दिन’!

539

अनेकांनी घेतला शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

मोताळा (BNUन्यूज) शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करुन भाजपासोबत सरकार स्थापन केले. यामुळे शिंदेगट व ठाकरेगटाचा वाद न्यायालयापर्यंत पोहचल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाला आयोगाने चिन्हे सुध्दा दिली आहेत. मराठी माणूस व बाळासाहेबांचा कडवट हिंदू उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असल्याने मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादीतील काही नाराजांमुळे घाटाखाली ठाकरे गटाच्या शिवसेनेला भविष्यात ‘अच्छे दिन’ येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तूळात वर्तविली जात आहे.

मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना संपर्क नेते प्रा.नरुभाऊ खेडेकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला जिल्हाप्रमुख शिवसेना चंदाताई बढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, तालुकाप्रमुख मोताळा अनंता दिवाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस मोताळा भागवत शिकारे, तालुका अध्यक्ष ओबीसी सेल गजानन कुकडे, तालुकाध्यक्ष कामगार सेल सागर भोंडेकार, तालुका उपाध्यक्ष सुधाकर सुरळकर. उपाध्यक्ष महादेव कर्नल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनंता पाटील, तालुका सचिव सुधाकर माहुरे, कोषाध्यक्ष पुंडलिक जुनारे, युवक सचिव गणेश भोंडेकार, तालुका उपाध्यक्ष सामाजिक न्याय विनोद गोरे, नितीन धांडे, ओमप्रकाश बोर्डे अश्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने घाटाखाली ठाकरेगट शिवसेनेला ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात असलेतरी घाटाखालील मोताळा तालुक्यात शिवसेनेचे कार्यालय केंव्हा उघडल्या जाते, असा प्रश्न सुध्दा अनेकजणांकडून उपस्थित केल्या जात आहे.

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी शुभम घोंगटे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी शुभम घोंगटे यांची युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. शुभम घोंगटे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असून ते सन २०१२ पासून शिवसेनेत सक्रिय आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील युवा सैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.