युवानेते मृत्यूंजय गायकवाडची सामाजिक बांधिलकी..युवकाला वेळीच उपचार मिळाल्याने वाचला डोळा!

379

बुलढाणा (BNUन्यूज) बुलढाणा तालुक्यातील करडी येथील विजय शिवणकर याच्या डोळ्यात भाऊबीजच्या दिवशी फटाके फोडतांना बारुद गेली होती. त्याला बुलढाणा येथील हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करुन घेण्यास कोणताही डॉक्टर तयार नसल्याचे धाड येथील कार्यकर्त्यांनी युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी लगेच नेत्रतज्ज्ञ डॉ.सुभाष जोशी यांच्याकडे विजय शिवणकरच्या उपचाराची वेळीच व्यवस्था केल्याने विजयचा डोळा निकामी होता होता वाचला.

सामाजिक, धार्मिक तथा दुसऱ्यांच्या मदतीला रात्री-अपरात्री मदतीला धावून जाणारे नाव म्हणजे आ.संजय गायकवाड यांचे सुपूत्र युवानेते मृत्यूंजय गायकवाड हे आहेत. त्यांनी राजूर येथे कार उलटी पडली असतांना त्यातील चालकाला सुखरुप बाहेर काढले होते. आदी अनेकांना त्यांनी मदत केल्याने जीवनदान  मिळाल्याने त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. असाच एक प्रकार 26 ऑक्टोबरच्या रात्री 11.30 ते 12  वाजेच्या दरम्यान करडी येथे फटाके उडवितांना युवकाच्या डोळ्यात बारुद गेल्याचा प्रकार घडला. धाड येथील वैभव सोनुने यांच्यासह कार्यकर्त्याचा मृत्यूंजय गायकवाडला फोनवरुन सांगीतले की, करडी येथील विजय शिवणकर याच्या डोळ्यात फटाके उडवितांना बारूद गेल्यामुळे गंभीर स्वरूपाची इजा होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्याला बुलडाणा येथे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करुन घेत नसल्याचे सांगितले. मृत्युंजय गायकवाड यांनी ताबडतोब विजयला बुलडाणा येथील डोळ्याचे हॉस्पीटल डॉ.जोशी येथे घेऊन येण्याचे सांगितले. त्यावेळी मृत्यूंजय गायकवाडने नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुभाष जोशी यांना कॉल केला असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हॉस्पीटलमध्ये दाखल होवून वेळीच विजय शिवणकर या बावीस वर्षीय युवकावर उपचार केल्याने त्याचा डोळा निकामी होता-होता वाचला.

गावकऱ्यांनी व्यक्त केले मृत्यूंजय गायकवाडचे आभार..

ऑपरेशन करतेवेळी मृत्यूंजय गायकवाड हॉस्पीटलमध्ये जातीने हजर होते. विजयचे ऑपरेशन यशस्वी झाल्याने धाड परिसरातील कार्यकर्त्यांनी मृत्यूंजय संजय गायकवाड तसेच डॉक्टर सुभाष जोशी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी हॉस्पीटलमध्ये ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, तसेच धाड परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.