केळवद येथील ‘जोमाळकर बंधूची’ वैद्यकीय क्षेत्रात उत्तूंग भरारी..! ज्ञानराज व प्रतिक MBBS तर डॉ.जयची MD साठी निवड !!

598

बुलढाणा(BNUन्यूज) वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावे हे बहुतांश पालकाचे स्वप्न असते, मात्र त्या स्पप्नाला लक्ष केंद्रीत अभ्यासाची जोड दिल्यास यश संपादन करणे सहज सोपे होते, असेच घवघवीत यश चिखली तालुक्यातील केळवद येथील जोमाळकर बंधूनी संपादीत करीत ज्ञानराज व प्रतिक MBBS तर जयची MD साठी निवड झाली आहे.

शिक्षक भागवत जोमाळकर यांच्या डॉ.जय या मुलाची MD साठी (बालरोग तज्ज्ञ) नायर हॉस्पिटल मुंबई, तर एमबीबीएसला ज्ञानराजची शासकीय मेडिकल कॉलेज नांदेड येथे निवड झाली आहे. शिक्षक रामेश्वर जोमाळकर यांचा मुलगा प्रतिक हा एमआयएमईआर मेडिकल कॉलेज पुणे येथे एमबीबीएससाठी पात्र ठरला आहे. एकाच वेळी जोमाळकर कुटुंबातील तीघे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशीत झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायत, विठ्ठल मंदीर संस्थान, जगतगुरु संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, पंचशिल मित्र परिवार तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कुटुंबासाठी आजी- आजोबांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव होती. डॉक्टर होवून वैद्यकीस सेवा करावी यासाठी प्रेरणा परिवाराकडूनच मिळाली. माझ्या यशानंतर ज्ञानराज आणि प्रतिक या भावडांना मार्गदर्शन करु शकलो. सातत्यपूर्वक परिश्रम घेतल्यास यशाला गवसणी घालता येते, वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थांनी न्यूनगंड न बाळगता यश संपादन करावे.
-डॉ.जय भागवत जोमाळकर,
एमडी बालरोग तज्ज्ञ, नायर हॉस्पिटल, मुंबई