विवाहितेचा पैश्यासाठी छळ; पतीवर गुन्हा दाखल !

288

मोताळा(BNUन्यू) आई-वडिलांनी लग्नात काही दिले नाही, माहेरवरुन 50 हजार रुपये आण, असे म्हणत पतीने चापट बुक्क्यानी मारहाण केल्याची फिर्याद बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या कोथळी येथील एका विवाहितेने बोराखेडी पोस्टे.दिली. सदर फिर्यादीवरुन आरोपी दारुड्या पतीविरुध्द भादंवीचे कलम 498 A सह विविध कलमान्वये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

विवाहीता सौ.रविना दिपक नाफडे ह.मु.कोथळी यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिपक सुरेश नाफडे याचेशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले असून अनूज व अन्वीत असे दोन मुले असून पती दिपकला दारुचे व्यसन असल्याने पती काहीना काही कारणावरुन रविनाचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. 15 मे 2022 रोजी पती दारु पिवून आला व हुज्जत घालून तुझ्या आई-वडिलांनी लग्नात काही दिले नाही. माहेरवरुन 50 हजार आण यासाठी चापटबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्याचे केस ओढली होती, त्यावेळी 18 मे 2022 रोजी पतीविरुध्द महीला तक्रार निवारण केंद्र बुंलढाणा येथे तक्रार दाखल केली होती. त्या ठिकाणी समझोता होवून फिर्यादी रविना नाफडे नांदावयास गेली होती. काही ते पती चांगला राहिला नंतर त्याने परत माहेरवरुन पैसे आणण्याचा तगादा लावून फिर्यादी रविना व त्यांच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. परत 19 सप्टेंबर 2022 रोजी महिला तक्रार निवारण केंद्र बुलढाणा येथे तक्रार दाखल केली होती. परंतु कोणत्याही प्रकारचा समझोता न झाल्याने फिर्यादीची तोंडी फिर्याद व महिला तक्रार निवारण केंद्र यांचे आरोपी पतीविरुध्द कायर्वाही करण्याचे पत्र व जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे पत्र मिळाल्याने आरोपी पती दिपक नाफडे नांदुरा याच्यावर 10 नोव्हेंबरच्या रात्री 12.32 मिनीटांनी बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 323, 498A, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.