पैसे काढणाऱ्या इसमाची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या स्थागुशा.ने मुसक्या आवळल्या!

259

50 हजाराचा मुद्देमाल जप्त; तीन गुन्हे आणले उघडकीस

buldananewsupdate.com
बुलढाणा(22Dec.2022)सध्या फाईव्ह जी चा जमाना आहे. या जमान्यात कोण कशी फसवणूक करील याचा नेम नाही. काही भामटे बँके बाहेर फसवणूक करण्यासाठी नेम धरुन बसलेले असतात. अशीच एक घटना डोणगाव येथे घडली. स्टेट बँकेतून काढलेले पैसे विड्राल चुकीचा भरला, अशी बतावणी करुन पुंजाजी खंदारे नागापूर यांचे 50 हजार रुपये लंपास करणाऱ्या मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील आरोपी दानीश अकील शेख याच्या स्थानिक गुन्हा शाखेने 21 डिसेंबरच्या रात्री मुसक्या आवळीत त्याच्याकडून 50 हजार रपये जप्त केले आहे.

वैज्ञानीक युग व फाईव्ह जी चा जमाना असल्याने, चोरटे नवीन नविन शक्कल लढवित आहे. ते चोरटे बँकेच्या समोर घाट घालून बसलेले असतात. परंतु ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ याची काही ठिकाणी परचिती येते तर काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सापडून देखील आरोपी पकडल्या जात नाही. परंतु पोलिसांनी मनात आणले तर चोरट्यांपेक्षा पोलिसांचे नेटवर्क वरचढ ठरू शकते. अशीच धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांनी आज 22 डिसेंबर रोजी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करुन त्याच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले असून पोस्टे.डोणगाव तसेच पोस्टे.देऊळगाव राजा व पोस्टे.सीटी कोतवाली अकोला येथील दोन गुन्हे उघडकीस आणले.

विड्राल चुकल्याची केली होती बतावणी
मेहकर तालुक्यातील नागापूर येथील दामोदर पुंजाजी खंदारे यांनी ग्रामीण कुटा बँकेकडून बचत गटाचे 50 हजाराचे कर्ज पत्नीच्या नावाले काढले होते. बँकेने सदर पैसे स्टेट बँकेत जमा केल्याने ते काढण्यासाठी 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान स्टेट बँक शाखा डोणगाव येथे जावून 50 हजार रुपये बँकेतून काढून परतले असता आरोपी दानिश अकील शेख रा.रोहिणखेड ता.मोताळा याने खंदारे यांच्या लक्ष ठेवून त्यांच्या साधेपणाचा फायदा घेत त्यांचा पाठलाग करुन तुम्हाचा विड्राल चुकला तुम्हाला मॅनेजरने बोलाविले असून ते पैसे बँकेत जमा करावे लागतील अशी बतावणी करुन 50 हजार रुपये लंपास केले होती, याची डोणगाव पोस्टे.नोंद करण्यात आली होती.

स्गागुशा पथकाने केली कारवाई..
स्थागुशा.पोलिस निरीक्षक जिल्हा पेालिस अधिक्षक सारंग आवाड व अप्पर पोलिस बी.बी.महामुनी व खामगाव अप्पर अधिक्षक अशोक थोरात व स्थागुशा .पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमीत वानखडे, विलासकुमार सानप, मनिष गावंडे, श्रीकांत जिंदमवार, पोलिस अंमलदार दिनेश बकाले, अजिस परसुवाले, गजानन गोरले, सरीता वाकोडे, मधूकर गारड यांनी केली.