वृध्द कलावंतांना ‘अच्छे दिन’! मानधनपात्र लाभार्थी निवडीत वाढ करणार-ना.मुनगंटीवार

270

@buldananewsupdate.com
संजय निकाळजे
चिखली(24Dec.2022) वृध्द कलावंत साहित्यीक मानधन पात्र लाभार्थी निवड संख्येत वाढ करण्याच्या कलावंत न्याय हक्क समितीच्या मागण्यांना तत्वतः मान्यता, देण्यात आली असून इतर मागण्यावरही सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन राज्याचे वने,सांस्कृतिक, मत्स्य पालन कार्य मंत्री ना.सुधीर मूनगंटीवार यांनी कलावंत शिष्ट मंडळास दिले आहे.

विश्राम गृह यवतमाळ येथे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लोक कल्याणकारी निर्णयासाठी नाविण्यपूर्ण कार्य करणारे मंत्री म्हणून ख्यातीपात्र असलेले सुधीर मूनगंटीवार यांना राज्याचे सांस्कृतिक विभाग कार्य मंत्री पदाचे कार्यभार मिळाल्याने राज्यातील कलावंताच्या आशा उंचाविल्या असून कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे विचार सत्कार प्रसंगी समितीचे विदर्भ प्रमुख अ‍ॅड..श्याम खंडारे ह्यानी व्यक्त केले. गावखेड्यातील धार्मीक भजन गायन प्रबोधन करणारे, उपेक्षीत कलावंतांच्या न्याय्य मागण्या व त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कोणते निर्णय घेणे गरजेचे आहे, याचा आमूलाग्र विचार करून राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून लोक कलावंताना उभारी देण्याचा माझा संकल्प असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले. निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमूख गायक मदन वरघट,गायक रमेश वाघमारे,सिध्दार्थ भवरे साहेब,प्रबोनकार सिताराम राठोड,गायीका तथा सिने कलावंत गिता मेश्राम सह.मोठ्या संख्येनी कलावंत उपस्थित होते. याबाबत कलावंत न्याय हक्क समितीचे उपाध्यक्ष शाहीर प्रेमसागर कांबळे, जिल्हाध्यक्ष एस के जाधवसर, संघटक गायक विजय मलवार, महासचिव, पत्रकार तथा गायक संजय निकाळजे यांनी ना.मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

अशा आहेत वृध्द कलावंतांच्या न्याय्य मागण्या..
वृध्द कलावंतांच्या मानधनामधे वाढ करावी,जिल्हानिहाय मानधन पात्र लाभार्थी संख्येत दूप्पटीने वाढ करावी,कलावंतांचे जिवनमान सूधारण्यासाठी कलावंत आर्थीक विकास मंडळ गठीत करावे, कलावंतांना मोफत एस टी प्रवास सवलत द्यावी,बेघर कलावंताना शासनाचे घरकूल योजनेत प्राधान्य देवून घरकूल द्यावे, कलावंताच्या न्याय्य मागण्या,समस्या व प्रश्न घेवून त्याना दिलासा व हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी व राज्यातील तळागाळातील गाव खेड्यापर्यंत पोहोचलेली महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या पदाधिका-यांना जिल्हास्तरावरील शासकीय वृध्द कलावंत समितीवर सदस्यपदी निवड करावी, कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने मंजूर केलेली एकल कलावंताना पाच हजार रूपयाचे आर्थीक सहाय्य राशी अद्याप कलावंताना मिळाली नाही त्याचे वाटप लवकर करण्याचे निवेदन समितीचे विदर्भ विभाग प्रमूख अ‍ॅड..श्याम खंडारे यांनी देवून मंत्रीमहोदयांशी चर्चा केली. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी जिल्हानिहाय सध्या असलेली साठ ते शंभर लाभार्थीच्या निवड संख्येत वाढ करण्याचे मान्य केले व ईतरही न्याय्य मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.