भूमिमुक्ती मोर्चा-बहुजन मुक्तीचा हिवाळी अधिवेशनावर बुधवारी सत्याग्रह मोर्चा!

199

भाई प्रदीप अंभोरेंच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन

संजय निकाळजे
@buldananewsupdate.com
चिखली(27Dec.2022) बहुजन,भूमिहीन अतिक्रमितांचे जमीन व घराच्या पट्टेसाठी शहीदांच्या आत्महत्येचा जाब विचारण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी नागपूर विधानसभा हिवाळी अधिवेशनावर भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सत्याग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे बुधवार 28 डिसेंबर रोजी हा मोर्चा भूमि मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे व राज्य प्रवक्ता बाबुराव सरदार यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात येणार आहे.

या मोर्चा संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांना एका निवेदनाद्वारे दिली असून दिलेल्या निवेदनात प्रलंबित मागण्यांचा उल्लेख केला. 28 नोव्हेंबर 1991 रोजी चे निर्णयानुसार भूमिहीनांना कायमस्वरूपी पट्टा मिळावा. शासन निर्णय 12 जुलै 2011 व शासन निर्णय 2022 चा निर्णय तात्काळ रद्द करावा. अतिक्रमण धारकांच्या व शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला 6 हजार हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी. राज्यातील भूमिनांची 100% कर्ज प्रकरण. राज्य शासनाने भूमिनांच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात मागावी. अपात्र वनदावेरांचे पुनर्विलोकन करावे. तसेच पात्र पट्टे धारकांना पट्टे वाटप करून वन जमीन दावेदारांना तात्काळ मदत द्यावी. दलित अत्याचारास प्रतिबंध करावा. वनविभाग बुलढाणा यांच्याकडून वनदावेदारांना अपील दाखल होईपर्यंत संभाव्य बेकायदेशीर त्रास थांबवावा.रमाई व पंतप्रधान घरकुल योजना अतिक्रमित जागेवर बांधकाम परवानगी तसेच बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावे. बुलढाणा जिल्हा सह राज्यातील वडार समाजाला गौण खनिजांची रॉयल्टी मंजूर करावी. सावरगाव डुकरे ता चिखली येथील स्मशानभूमीचे प्रकरण तात्काळ निकाली काढावे. उदयनगर ता चिखली येथील चिखली- खामगाव प्रस्तावित सबतरीकरण 16 हजार कोटी रुपयांचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. चिंचखेड ता देऊळगाव राजा येथील बौद्ध समाज दिलेल्या सहान जागेचे नमुना-8 अ तात्काळ देण्यात यावे.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व्यक्तीस भूसंपादन कायद्यांतर्गत नुकसान भरपाई म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जितकी जमीन शासनाने संपादीत केली तितकीच जमीन म्हणजे पर्यायी जमीन शासनाने त्यास उपलब्ध करून द्यावी. अमडापूर येथील सर्वे क्रमांक 437 गट नंबर 663 मधील पूर्वीचे ख्रिश्चन स्मशान भूमी इंदिरानगर येथील मागासवर्गीय बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमी करता हस्तांतरित होण्यासह आदी मागण्यांसाठी 28 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भाई प्रदीप अंभोरे, बाबुराव सरदार, महादेव वरठे, ब्रह्मानंद नवघरे, भास्कर अंभोरे, राजाराम वल्लाळ, रवींद्र उमाळे, भीमराव खरात, शेषराव चव्हाण, सुभाष घुगे ,प्रमोद पोहेकर, दिलीप रामटेककर, मधुकर मिसाळ, मनीषा खोत, सिद्धार्थ सावदेकर, रमेश गाडेकर, प्रकाश वानखेडे यांच्यासह आदी विभागवार नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.