कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

244

नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन

बुलढाणा(24Dec.2022) देशात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांना लागणारा ऑक्सिजन, बेड आणि औषध पुरवठा जिल्हा प्रशासनाने सज्ज ठेवला आहे.

कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन योग्य ती उपाययोजना करत आहे. तरीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच नागरिकांचा वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत आहे. ज्या नागरीकांनी बुस्टर डोज अद्यापही घेतलेला नाही, त्यांनी तात्काळ बुस्टर डोज घ्यावा, तसेच गर्दी होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब केल्यास कोरोनाचा संसर्ग थांबविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आहे.