..आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’अभियान!

219

@buldananewsupdate.com
बुलढाणा(7JANU.2023) प्रचंड महागाई, वाढती बेरोजगारी, असाह्य आर्थीक आणि सामाजीक विषमता तसेच देषातील व्देषाच्या राजकारणा विरूध्द ही निर्णायाक लढाई आहे. राहुलजी गांधीजी आणि काँग्रेसच्या विचारधारेशी देशातील करोडो जनता जोडलेली आहे. या पाश्वभूमीवर अ.भा.काँग्रेस कमिटीच्यावतीने भारत जोडो नंतर देशपातळीवर ‘हात से हात जोडो’ अभियान हाती घेतले असून प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यातील सर्व गावात झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करून हात से हात जोडो अभियानाची सुरूवात करुन असून जिल्ह्यात ‘हात से हात जोडो’ अभियान प्रभाविपणे राबविणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

चिखली येथे 6 जानेवारी रोजी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करतांना राहुल बोंद्रे बोलत होते. या बैठकीला प्रकाश पाटील, मनोज कायंदे, दिपक देशमाने, गजानन खरात, रवि पाटील, साहेबराव पाटोळे, नंदुभाउ सवडतकर, विष्णु पाटील कुळसुंदर, अशोककराव पडघान, कुणाल बोंद्रे, एजाज मंत्री, श्यामभाउ पठाडे, सैयद इरफान, जगन्नाथ पाटील, तुळशिराम नाईक, रमेशदादा कायंदे, सतिष मेहंद्रे, सुनिल सपकाळ, वसंतराव देशमुख, संताराम तायडे, रामभाउ जाधव, डॉ.मोहमंद इसरार, प्रदिप पचेरवाल, राजेश पोलाखडे, निलेष पाउलझगरे, कलीम खान, डॉ.सत्येंद्र भुसारी, समाधान सुपेकर, सुनिल तायडे, भगवान धांडे, गजानन मामलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

राहुल गांधींच्या विचारधारेशी करोडो जनता जोडलेली आहे..
देशात नवा इतिहास लिहणारे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारतजोडो यात्रा’ 120 दिवस पूर्ण करून हारियाणा मधून जम्मू कश्मीरकडे प्रवास करीत आहे. भारतजोडो यात्रेने आता राष्ट्रीय चळवळीचे रूप घेतले असून प्रचंड महागाई, भिषण बेरोजगारी, असह्य आर्थीक आणि सामाजीक विषमता तसेच देशातील द्वेषाच्या राजकारणाविरूध्द ही निर्णायक लढाई असून देशातील करोडो जनता राहुलजी गांधी व काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेली आहे.

लोकशाही व समतेचा विचार बळकट करण्यासाठी अभियान-उमाळकर
महापुरूष समाज सुधारक आणि संतांनी दिलेला समतेचा विचार हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपात आपल्या सर्वांना दिला, मात्र सध्या लोकशाहीचे काही स्तंभ डळमळीत होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा लोकशाही व समतेचा विचार अधिक बळकट करण्यासाठी ‘हात से हात जोडो’ अभियान राबविणार असल्याचे राज्य समन्वयक श्यामभाऊ उमाळकर म्हणाले.