बाप्पारे….! बुलडाणा अर्बनच्या कोथळी शाखेत तिघांनी मारला 1 कोटी 37 लक्ष रुपयांवर डल्ला!

5878

बोराखेडी पोस्टे.ला आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा ( 6 ‍Feb. 2023) बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेच्या मोताळा तालुक्यातील कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष 59 हजार रुपयांवर डल्ला मारला असून या प्रकरणी तीन आरोपींवर आज सोमवार 6 फेब्रुवारी रोजी सचिन झंवर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोताळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्या.बुलडाणा पतसंस्थेच्या कोथळी शाखेत व्यवस्थापक सुनिल गांधी, लिपीक सतिष राठी व मधुकर सावळे यांनी संगनमताने कोथळी संस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी शाखेत जमा न करता बनावट नोंदी करुन ते शाखेत जमा झाल्याचे ठेवीदारांना भासविले. खातेदारांचे सेव्हींग खात्यावरील पैसे त्यांच्या मुदत ठेव खात्यावर वेळेत न करता शाखेतील इतर खात्यावर वळती करुन १ कोटी ३७ लक्ष ५९ रुपयांवर डल्ला मारल्याच्या सचिन झंवर यांच्या फिर्यादीवरुन आज 6 फेब्रुवारी रोजी सुनिल गांधी, सतिष राठी व मधुकर सावळे यांच्यावर बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 409, 420, 465, 471, 34 अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.