त्यागमूर्ती माता रमाई जयंतीदिनी ज्येष्ठ लोककलावंतांचा जांभोरो येथे सन्मान सोहळा !

210

BNU न्यूज नेटवर्क..
चिखली ( 6 ‍Feb. 2023) लोककलावंतांचा सन्मान, निरंतर जनकल्याण हे ब्रीदवाक्य घेवून जांभोरा येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान सोहळा मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे हे उपस्थित राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ शाहीर डी.आर.इंगळे, साहित्यिक किरण डोंगरदिवे, साहित्य समीक्षक रवींद्र साळवे, शाहीर शिवाजी लहाने, ज्येष्ठ शाहीर नानाभाऊ परीहार, सामाजिक कार्यकर्ते अनंत मिसाळ, किशोर कदम, सरपंच उमा गायकवाड, वीर पिता भारत पवार, वीरमाता उज्वला पवार, अभिमन्यू पवार, एस एस गवईसर, सिद्धार्थ मोरे आदींचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ लोककलावंत, कवी, गायक कवीश्वर अवचार, पांडुरंग अवसरमोल, शाहीर लजपतराव गवई, बाबुराव साळवे, मोहन वानखेडे, सुभद्राबाई गवई, चंद्रभागाबाई जाधव, चंद्रशेखर साळवे, भिकनराव घेवंदे, भारत साबळे आदी मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लोक कलावंत शाहीर, कवी गायक, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले लोक. बहु. सांस्कृ. मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.