शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत मातीला अभिवादन!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (15 Feb. 2023) छत्रपती शिवाजी महाराज ज्या गडकिल्ल्यांवर वावरले, ज्या मातीला महाराजांचा पदस्पर्श झाला अशी पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य बुलढाणा शहर वासीयांसह जिल्हातील शिवप्रेमीना लाभणार आहे. प्रमुख पाचगडावरील माती शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य समारंभाच्या दर्शनी ठेवून अभिवादन केले जाणार आहे.
बुलढाणा नगरीत होणारा शिवजन्मोत्सव व सोहळा आगळावेगळा साजरा होत आहे. शिवजयंती उत्सव समितीचे पहिले अध्यक्ष पत्रकार रणजीत सिंग राजपूत ,सचिव सुनील सपकाळ यांनी पहिल्याच शिवजयंतीला अनेक पांयडे पाडले जे संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठराव अशीच आहे. नाचून नव्हे तर शिवचरित्र अंगीकारून यंदाची शिवजयंती डॉ. शोण चिंचोले यांच्या नेतृत्वात धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. डॉक्टरी पेशा असूनही त्यांनी स्वतःला वाहून घेतले असून माजी अध्यक्ष राजेश हेलगे,डॉक्टर राजेश्वर उबरहांडे,सागर कालवाघे, Adv.जयसिंग राजे देशमुख,कुणाल गायकवाड, अनिल रिंढे, शिवप्रेमी , पदाधिकारी झटत आहे. शस्त्र प्रदर्शनी, पोवाडे ,सांस्कृतिक कार्यक्रम, भव्यदिव्य शोभायात्रा अशी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल आहे. या सर्व कार्यक्रमात जिल्हावासियांनीं सहभाग घ्यावा असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले यांनी केल आहे.
पाच गडावरची माती..
स्वराज्याचा कारभार चालला तो दुर्गदुर्गेश्वर रायगडावरून, तेव्हापासून रायगड हा श्रद्धेचा व आस्मितेचा विषय झाला आहे. याच रायगडाला महाराजांचा पदस्पर्श अनेकदा लाभला. प्रतापगडावर महाराजांनी भीम पराक्रम केला. सिंधुदुर्ग सारखा जलदुर्ग महाराजांच्या वैचारिक उंचीची साक्ष ठरला तर राजगड आणि सिंहगड देखील इतिहासाच सुवर्णपान ठरले आहे. या सर्वगडावरील पवित्र माती बुलढाणा शहरात आणण्याची परंपरा सागर काळवाघे या शिवप्रेमीने जोपासली आहे. यंदाही या गडावरील पवित्र मातीला अभिवादनासाठी ठेवले जात आहे. ही पवित्र माती भाळी लाऊन कृतकृत्य व्हावे असे आवहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी केले आहे
अखंड शिवज्योतही येणार..
जिजाऊ साहेब या तर स्वराज्याच्या जननी..त्यांच्या मायभूमीतून म्हणजेच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून अखंड शिव जोत 18 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम स्थळी आणली जाणार आहे. याचे स्वागताचे जय्यत नियोजन डॉक्टर शोण चिंचोले यांनी केले असून निळकंठ बिडवे, श्रेयस मोहिते, ऋषिकेश सुरडकर, अक्षय सुरोशे, संदीप गावंडे हे मावळे परिश्रम घेत आहे.