आगीत होरपळून 35 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू!

537

मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..

मलकापूर (15 ‍Feb. 2023) मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या खोलीला आग लागून त्यामध्ये दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज 15 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. मृतकाचे शेतकऱ्याचे नाव गणेश विजय नारखेडे असे आहे.

मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील 35 वर्षीय युवा शेतकरी गणेश विजय नारखेडे हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान रात्री गणेश नारखेडे शेतातील खोलीत झोपले होते. रात्रीच्या सुमारास खोलीस अचानक लाग लागून त्यामध्ये त्यांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज 15 फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी सदर माहिती मलकापूर ग्रामीण पोस्टे.ला देताच ठाणेदार एफ.सी.मिर्झा यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. आग कशी लागले याचे कारण मात्र समजू शकले नाही.