जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (16 Feb. 2023)मोताळा तालुक्यातील रोहिणखेड गावाजवळील पोल्ट्रीफार्मजवळ रोहिणखेड येथील ऑटो प्रवाशी घेवून जात असतांना आज दुपारी 5 वाजेच्या दरम्यान ऑटो पलटी झाले. यामधील जखमी 5 जणांना 108 वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार हा मोताळाचा आठवडी बाजार असल्याने रोहिणखेड येथील ऑटो चालक प्रमोद(बाळू) देशमुख हे आपल्या ऑटो क्र.एम.एच.28 एच.5855 मध्ये आज 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास ऑटोमध्ये प्रवाशी घेवून मोताळ्याकडे जात होते. यावेळी ऑटोमध्ये पाटीवर पंम्प घेवून जाणाऱ्या एका इसमाने हालचाल केल्याने ऑटो रोडच्या खाली उतरला, ऑटो रोडवर घेत असतांना ऑटो पलटी झाला. यामध्ये ऑटोमधील प्रवासी शमशाद मेहबूब शहा (वय 60), रमेश इंगळे (वय 32), सोनुबाई इंगळे (वय 20), गोपाळ पेाकळे (वय 30) व रोशनी रमेश इंगळे (वय 11) सर्व रा.रोहिणखेड हे जखमींना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
डॉ.डोंगरे व अंकुश वाघ यांची कर्तव्यदक्षता..
मोताळा तालुक्यात कुठेही अपघात झाल्याची माहिती 108 अॅम्बुलन्स चालक अंकुश वाघ त्यावरील डॉ.शुभम डोंगरे यांना मिळताच ते क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहचवून रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवित असल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळाल्याने जिवनदान मिळाले आहे.
युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांनी केली रुग्णांची विचारपूस..
रोहिणखेड येथे अपघात झाल्याची माहिती प्रसाद हुंबड व गणेश राजस यांनी युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांना देताच मृत्यूंजय यांनी क्षणाचाही विलंब न लावता अॅम्बुलन्स पोहण्याआठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचून जखमीं झालेल्या रुग्णांशी चर्चा करुन त्यांना डॉक्टरांकडून वेळेवर उपचार उपलब्ध करुन दिले.