चिखली तालुक्यातील वळती येथे फाईव्हजीच्या युगात अंधश्रध्दा पसरविण्याचा प्रयत्न!

806

BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (16 ‍Feb. 2023)या विज्ञानाच्या युगात मानवाने मंगळापर्यंत मजल मारली असून मंगळावर घरे बांधण्यास मानव सज्ज झाले आहे. परंतु अजुनही खुळा कल्पनांना या वैज्ञानीक युगात पध्दशीरपणे रुजवित दहशत पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशीच एका घटना चिखली तालुक्यातील वळती या गावात नुकतीच उघडकीस आली आहे.

वळती येथे कणीकचा दिवा तयार करुन त्यावर हळदी कुंकू मंतरलेले अंड रस्त्यावर ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, यावेळी परिसरातील नागरिक विशेषत महिला खुप भयभीत झाल्या होत्या. सदर घटनेची माहिती मिळताच अखील भारतीय अंधश्रध्दा निमृर्लन समितीचे दक्षीण बुलडाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट यांनी भेट देऊन सदर कृत्यामागील कारण मिमासा विषद करून तेथील मंतरलेला दिवा अंडी व इतर साहीत्य उचलून घेतले आणी प्रबोधन करून त्यांचे मनातील भिती दूर केली. वळती येथील कृषी पदविधर असलेले सेवानिवृत्त शिक्षक तेजराव जगताप यांचे संकल्पनेतून विकसीत झालेले कृषी पर्यटन केद्र मामाचं वावर या नावाने परिसरात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दीस आले आहे. सदर केद्राची दिवसेंदीवस वाढत चाललेली लोकप्रियता सहन न झालेल्या शेजारीच असलेल्या इसमाने हे कृत्य केले असल्याचे लक्षात आले . या बाबत कृषी पर्यटन केंद्राचे संचालक मोहन जगताप यांनी सांगीतले की आमचे विरोधातील हे मोठे कुटील षढयंत्र होते. सदर बाब लक्षात आल्याने अंडी व पुजा तसेच साहित्यातील कनिकचा पेटविलेला दिवा आपोआप विझेपर्यत रात्रीच्यावेळी आम्हाला थांबावे लागले नाहीतर लगतच असलेल्या वाळलेल्या गव्हाला आग लागून मोठे नुकसान झाले असते .

अंधश्रध्दा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही..
अंधश्रध्दा पसरविणे हा मोठा गुन्हा आहे. अंधश्रध्दा पसरविण्याचा प्रयत्न वळती येथील प्रमुख मार्गावर मामांच वावर नावाच्या बोर्डासमोर आढळून आला तेथेही भितीयुक्त वातावरण निर्माण केले आहे. सदर अंधश्रध्दा पसरविण्याचे कृत्य करणार व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या जादुटाणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला जमानत सुध्दा मिळत नाही.
-दत्ताभाऊ सिरसाट
अनिसं. दक्षिण बुलडाणा जिल्हा संघटक