जिल्ह्यात 5 ते 7 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता!

564

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3 Mar.2023) भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात 3 व 4 मार्च रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून ५ ते ७ मार्च दरम्यान काही तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पाच दिवसांच्या कालावधीत तालुक्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी गहू , हरभरा, रब्बी ज्वारी पिकांची ताबडतोब कापणी करावी. कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, साठवणूकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टीक शीटने झाकून ठेवावा. कापणी केलेल्या फळांचीयोग्य त्या ठिकाणी साठवणूक करावी. संभाव्य अवकाळी पावसापासून त्या फळांची प्रत व गुणवत्ता खालावणार नाही. मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सबंधित कालावधीत सुरक्षीत ठिकाणी बांधून ठेवावीत. शेतकरी बंधूंनी विजांच्या बाबतीत अचूक पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी दामिनी मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ,जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा यांनी केले आहे.