समाजातील सर्व पोट जातींना एकत्रीत आणणार- सुनिल जवंजाळ पाटील
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (5 Mar.2023) लग्न समारंभावरील खर्च कमी करून समाजाला एक सकारात्मक दिशा द्यावी, यासाठी सुनील जवंजाळ पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. बुलढाणा येथे 2 एप्रिल रोजी भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजातील सर्व घटकांना एकत्रीत आणून वधू-वर परिचय मेळावा भव्य करणार असल्याचे सुनिल जवंजाळ पाटील यांनी नियोजन बैठकीत बोलतांना सांगितले. या बैठकीला समाजातील मान्यवर मडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
बुलढाणा शहरात 2 एप्रिल रोजी गर्दे सभागृह येथे महाराष्ट्र मराठा सोयरीक या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पाच वर्षानंतर मराठा समाज उपवर वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष सुनील जवंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली मराठा समाजातील दिग्गजांचे उपस्थितीत मेळावा आयोजित करण्याचे ठरले. मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून सुनिल जंवजाळ यांनी आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मध्य प्रदेश येथे 30 पेक्षा अधिक वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करून समाजाला एक वेगळी दिशा दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिचय मेळावा बैठकीसाठी राजश्री शाहू परिवाराचे संस्थापक रामराव पाटील शेळके, डॉ शोन चिंचोले, माधवराव शेळके, बावस्कर साहेब डॉ.मनोहरराव तुपकर, प्रा. जगदेवराव बाहेकर , दिनकरराव चिंचोले, डॉ सौ संजीवनी शेळके, प्रा सौ ज्योती पाटील ,माया ठोंबरे , प्रभाकरराव काळवाघे यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थीत होते.
-
मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन