कंटेनरच्या धडकेत 32 वर्षीय युवक ठार

299

मलकापूर हायवेवरील वाघुळ येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मलकापूर (8 Mar.2023)मलकापूर-नांदुरा हायवे नंबर 6 वर शेतातून घराकडे पायदळ जाणाऱ्या एका 32 वर्षीय युवकाला नांदुराकडून मलकापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने समोरुन धडक देवून समोरच्या टायराखाली फरफटत नेल्याने त्यामध्ये युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 7 मार्च रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास कोल्हे पेट्रोलपंप वाघुळ येथे घडली. मृतकाचे नाव देवानंद तायडे असे आहे.

संदेश तायडे वाघुळ ता.मलकापूर यांनी मलकापूर शहर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ते तिघे भाऊ बहीण वाघुळ येथे राहतात. त्यांचे मामा दोलतराव मोरे यांचे कोल्हे पेट्रोलपंप हायवे नं 6 च्या शेजारी शेत असून ते शेतीची देखभाल करतात. त्यांचा भाऊ देवानंद निनाजी तायडे (वय 32) हे मंगळवार 7 मार्च रोजी हे शेतातून पायदळ घरी परत येत असतांना हायवे रोड क्रॉस करतांना नांदुऱ्यावरुन मलकापूरकडे जाणाऱ्या कंटेनर क्र. RJ -07 GD-1689 ने देवानंद तायडेला धडक दिल्याची माहिती संदेश तायडे यास गावातील रतन इंगळे यांनी 7 मार्चच्या दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून फिर्यादी हे घटनास्थळी पोहचले असता त्यांना कंटेनरने समोरुन धडक दिल्याने देवानंद तायडे नांदुरा-मलकापूर रत्याच्या कडेला पडलेला होता, असे नमूद करीत जखमी देवानंदला मलकापुर येथील उपजिरुग्णालय मलकापुर येथे भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले, अश्या संदेश तायडे यांच्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोस्टे.ला ट्रक चालकावर भादंवीचे कलम 279, 304 अ, 134, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.