खांडवा येथील 29 वर्षीय तरुण बेपत्ता !

269

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (8 Mar.2023) धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या खांडवा येथील 29 वर्षीय तरुणाने 26 फेब्रुवारी रोजी आई व पत्नीला बाहेर जावून येतो, असे सांगून घरुन निघून गेला होता. परंतु तो 7 मार्चपर्यंत परत न आल्याने चांगदेव तायडे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली.

चांगदेव पांडुरंग तायडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा 29 वर्षीय मुलगा सुबोध चांगदेव तायडे याने 26 फेब्रुवारी रोजी बाहेर जातो, असे सांगून निघून गेला होता. त्याचा गावात, परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तो आढळून न आल्याने आज बुधवार 8 मार्च रोजी धा.बढे पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली आहे.

  • हरविलेल्या युवकाचे नाव सुबोध चांगदेव तायडे असे असून उंची 6 फुट, रंग सावळा, पॅन्ट व शर्ट व पायात पांढरा स्पोर्ट शूज, केस काळे, चेहरा लांबट अश्या वर्णनाचा युवक कोणाला आढळून आल्यास धा.बढे पोस्टे.फोन नंबर 07267-241541, ठाणेदार सुखदेव भोरकडे मो. 9923061396, पोहेकाँ सुरेश सोनवणे मो. 9823961994 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.