बुलढाणा डीबी.पथकाची कारवाई; 52 हजाराचा मुद्देमाल जप्त !

471

12 तासात आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10 Mar.2023) सध्या जिल्ह्यामध्ये दररोज अनेक चोरींच्या घटना घडत आहे. आजही अनेक अज्ञात चोरट्यांचे नेटवर्क पोलिसांपेक्षा पावरुफुल्ल असल्याने ते पेालिसांच्या हाती लागलेले नाही. परंतु बुलढाणा शहर पोलिसांच्या डी.बी.पथकाने काही तासातच चोरींच्या घटनांचा शोध लावीत आज 10 मार्च रोजी चोरट्यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलढाणा शहरात काही दिवसापासून चोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली होती. चोरट्यांनी बुलढाणा शहरातील संगम चौकातील लकी ज्युस सेंटर येथे 8 ते 9 मार्चच्या रात्री दरम्यान दुकान फोडून गल्ल्यातील 70 हजार नगदी चोरुन नेले होते. याबाबत आरीफ बागवान विदर्भ हाऊसींग सोसायटी बुलढाणा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला होता. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत २ तासांचे आतच डीबी पथकातील अंमलदार यांनी विधीसंघर्ष प्रस्त बालकाला ताब्यात घेवून विचारपूस करुन यश साठे तसेच एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक यश साठे सोबत असल्याचे कबुल केल्याने आज शुक्रवार 10 मार्च रोजी यश संतोष साठे (वय 19) रा.मिलींद नगर, बुलडाणा व विधीसंघर्ष प्रस्त बालकला ताब्यात घेवुन दोन्ही विधीसंघर्ष प्रस्त बालक व आरोपी यश साठे याचेकडून नगरी ४१ हजार रुपये व चोरीच्या पैशातुन घेतलेला सॅमसंग कंपनीचा 11 हजार 400 रुपयांचा मोबाईल रुपये असा एकुण ५२ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 4 मार्चच्या रात्री टिकार बुक स्टोअर्स बुलडाणा जवळील बँक ऑफ इंडीया चे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अनोळखी आरोपी व ताब्यात घेण्यात आलेले विधीसंघर्ष ग्रस्त २ बालक हे एकच असल्याचे तपासाअंती सिध्द झाल्याने विधीसंघर्ष प्रस्त बालक या दोघांनी सदर गुन्हयाबाबत कबुली दिल्याने सदर गुन्हा दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी केला असल्याचे उघडकीस आला आहे. सदर कारवाई डी.बी.पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पेालिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोनि.प्रल्हाद काटकर यांच्या आदेशान्वये शहर पोस्टे.चे डी.बी पथकाचे पोउपनि सखाराम सोनुने, सहा.फौजदार माधव पेटकर, पोहेका. प्रभाकर लोखंडे, नापोको गजानन जाधव, नापोका सुनिल मोझे, गंगेश्वर पिंपळे महीला पोना सुनिता खंडारे, पोका शिवहरी सांगळे, युवराज शिंदे, विनोद बोरे, यांनी केलेली आहे. पुढील तपास सफौ नामदेव खवले, बळीराम खंडागळे ,नापोकों प्रकाश दराडे, गजानन मोरे हे करीत आहेत.