राजपत्रीत वर्ग-2 संवर्गाच्या ग्रेड पे वाढीसाठी जिल्ह्यातील 31 महसूल अधिकाऱ्यांचे 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन!

352

1) ना.तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी होणार सहभागी
2)13 मार्चला विभागीय आयुक्तांना निवेदन देवून करणार सुरुवात
3)कामबंद आंदोलनामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होणार
4)जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला निवेदनाद्वारे इशारा

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10 Mar.2023)न्याय्य मागण्यांसाठी निवेदन,उपोषण, मोर्च व आंदोलन, कामबंद आंदोलन करणे तसेच संपाचे हथीयार उपसणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नायब तहसिलदार, राजपत्रीत वर्ग-2 संवर्गाच्या ग्रेड पे वाढीसाठी वेळोवेळी संघटनेच्यावतीने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य असलेले उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार हे 3 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने आज शुक्रवार 10 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांना सामुहीक निवेदन देण्यासाठी 13 मार्चची नैमित्तीक रजा मंजूर करण्याची विनंती सुध्दा निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्या बाबत सन १९९८ पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. 13 मार्च रोजी एक दिवसीय सामुहीक रजा घेवून सकाळी ११.०० ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व विभागीय आयुक्‍त कार्यालय अमरावती येथे धरणे आंदोलन करुन विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी 13 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य असलेले उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार निवेदन देण्यासाठी अमरावती येथे जात असल्याने 1 दिवसीय नैमितीक रजा मंजूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप..

शासनाकडे न्याय्य मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नाही. संघटनेनी नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पे रुपये ४८०० रुपये मंजूर करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वाही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. तत्कालीन मा.अपर मुख्य. सचिव व मा. महसूल मंत्री व मा वित्तमंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपावेतो कोणताही अंमलबजावणी न झाल्याने तसेच के. पी. बक्षी यांचे अध्यक्षते खालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष नायब तहसिलदारयांचे ग्रेड पे ४८०० रुपये वाढविण्याबाबत विविध बाबींची पुर्तता करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० करणेबाबतच्या सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सदर रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भुमिका संघटनेद्वारा घेण्यात आलेली आहे.

यांनी दिला बेमुदत कामबंदचा इशारा..!

उपविभागीय अधिकारी- वैशाली देवकर, गणेश राठोड, राजेश्वर हांडे, मनोज देशमुख
तहसिलदार-श्यामला खेत, सैपन नदफ, आर.यु.सुरडकर, सारीका भगत, डॉ.अजितकुमार येळे, श्याम धनमने, रुपेश खंडारे, संजय गरकल, सुनिल सावंत, अश्वीनी जाधव, समाधान सोनवणे, राहुल तायडे, प्रिया सुळे, अनिल मचवड
नायब तहसिलदार-भांबळे, के.व्ही.पाटील, प्रमोद करे, हेमंत पाटील, कल्याण काळदाते, देवेंद्र कुऱ्हे, अ.वा.पवार, सातपुते, सुनिल अहेर, विजय पाटील, प्रकाश डब्बे, बी.एस.किटे, मुरली गायकवाड यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना 10 मार्च रेाजी दिला आहे.