एसटी.महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर..!

842

प्रवाश्यांना करावा लागतो भंगार बसेसमधून जीवघेणा प्रवास-अ‍ॅड..सतिषचंद्र रोठे

1) जीर्ण बसेस घेऊन वाहकांना स्वतःचा व प्रवाशांचाही जीव धोक्यात घालून करावी लागते ड्यूटी
2)अनेक एसटी बसेस रस्त्यातच फेल होत असल्याने प्रवाशांना होतो नाहक त्रास
3) पुढाऱ्यांच्या मालकीच्या अत्याधुनिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोठे कटकारस्थान असल्याचे समोर येत आहे.
4) पुढाऱ्यांच्या अत्याधुनिक बसेस भाडे तत्त्वावर घेण्यासाठीच महामंडळ स्वतःच्या बसेस जाणीवपूर्वक भंगार करत आहे.

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (26 Mar.2023) राज्यात एकीकडे एसटी.महामंडळ प्रवाशांना सुरक्षीततेची हमी देते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र भंगार बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. राज्यात अनेक एसटी.महामंडळाच्या बसेस भंगार व खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्या बसेस पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळत असल्याने प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडी करुन पावसापासून बचाव करावा लागतो. अश्याच एका भंगार पालपरी बसचा व्हीडीओ आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत भंगार बसच्या अती धुरामुळे चालक-वाहक, प्रवाशी तसेच रोडने जाणाऱ्यांना चालकांचा सुध्दा अपघात होवून जीव जावू शकतो, याकडे एसटी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड.रोठे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड डेपोची गाडी आज रविवार २६ मार्चला दुपारी तीन दरम्यान राजूर घाटातून बुलढाणाकडे जात असतांना सदर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धूर निघत होता. रोडच्या बाजुला वनविभागाचा जंगल असतांना तसेच बसमध्ये बसलेले प्रवाशी जीवघेणा प्रवास करीत होते. सदर बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना ये-जा करणे कठीण झाले होते. या धुरामुळे वेळप्रसंगी अपघात होण्याची ही शक्यता नाकारता येत नव्हती. एकीकडे ड्रायव्हर, कंडक्टर बसवर यायला 5 -10 मिनिटे विलंब झाल्यास त्यांचे निलंबन करण्यात येते, तर दुसरीकडे एसटी.महामंडळ स्वतःच्या बसेस जाणीवपूर्वक का भंगार करत आहे. एसटी महामंडळाचे स्वतःचे वर्कशॉप व इंजिनीयर असताना महामंडळाच्या बसेसला भंगार होण्याची वेळ येत आहे. सदर बसच्या प्रदुषणाचा फटका बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याही वाहनाला बसला आहे.

आझाद हिंद संघटना रस्त्यावर उतरेल..

एसटी महामंडळाच्या तथाकथित पुढाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या स्वार्थाकरिता सुरू असलेला भोंगळ कारभाराला त्वरित लगाम लावावा. प्रवाशांचे जीव धोक्यात घालण्याचे बंद करण्यात यावे, अन्यथा आझाद हिंद संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडेल असा इशारा अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे यांनी प्रसार माध्यमांच्या अंतर्गत एसटी महामंडळाला दिला असून अधिकाऱ्यांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढली..

महाराष्ट्र सरकारने एसटी.भाड्यात महिलांना 50 टक्के सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुलढाणा डेपो यासह आदी महामंडळाच्या बसेस अतिशय जीर्ण व भंगार झालेल्या आहेत. बसेसमध्ये महिलांची संख्या मोठी असल्याने, भविष्यात बसेस रस्त्यात बंद व अपघात होणार नाही, यासाठी एसटी.महामंडळाने याकडे लक्ष देवून चांगल्या बसेस रोडवर सोडण्याची मागणी सुज्ञ प्रवाशांकडून होत आहे.