ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

2016

मोताळा तालुक्यातील माकोडी गावाजवळील घटना; ट्रक चालक फरार

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (25 Mar.2023) ट्रक मातीचा, सिमेंट की गिट्टीचा असो सुसाट कर्कश आवाजाने या ट्रक चालकांनी जिल्ह्यामध्ये मोठा धुमाकूळ घातला आहे. अश्याच एका सुसाट सिमेंट घेवून जाणाऱ्या एका ट्रक चालकाने 60 वर्षीय दुचाकी स्वारास चिरडल्याने दुचाकी स्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून अतिरक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला. सदर दुदैवी घटना आज शनिवार 25 मार्च सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान मोताळा तालुक्यातील माकोडी येथील एका वळणावर घडली. मृतकाचे नाव विनोद इंगळे असे आहे.

प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील माकोडी गावानजीक ट्रक क्रमांक टीएस.-01 युसी-5704 हा माकोडी परिसरात सिमेंट खाली करुन आज 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान मलकापूरकडे सुसाट वेगाने परत जात होता. दरम्यान मलकापूरवरुन माकोडीकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की या धडकेत दुचाकीचा अक्षरश: चुराडा होवून दुचाकीवरील विनोद ज्ञानेदव इंगळे (वय 60) यांच्या मेंदुला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. संपूर्ण रोडवर रक्ताचा सडा पडला होता. एवढा भिषण अपघात होवून देखील ट्रक चालक सुसाट वेगाने घटनास्थळावरुन फरार झाला. सदर घटनेची माहिती धा.बढे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुखदेव भोकरडे यांना मिळताच ते आपल्या टीमसह खामगावकडे रवाना झाले आहे. सदर ट्रकला खामगाव हद्दीतील ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. ट्रकचालक मात्र फरार झाला आहे. पुढील तपास धा.बढे पोस्टे.चे ठाणेदार सुखदेव भोरखडे हे करीत आहे.

इंगळे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
मृतक विनोद इंगळे यांच्या पश्चात पत्नी असून त्यांच्या कंबरेमध्ये गॅप पडलेला आहे. तर दोन मुलींचे लग्न झालेले आहे. मुलगा गतिमंद आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.