इरला येथे आगीचे भिषण तांडव; 8 जनावरांसह 10 लाखाचे साहित्य जळून खाक!

1098

बुलढाणा तालुक्यातील घटना; सोमवारी रात्री लागली होती आग

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (28 Mar.2023) जिल्ह्यात आगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशी एक मनाला हेलावून टाकणारी घटना बुलढाणा तालुक्यातील इरला येथे सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घटना घडली. आगीमध्ये शेतकरी भागवत नारायण सरोदे यांच्या गट नं.144 मध्ये आग लागून त्यामध्ये 4 लक्ष 13 हजाराचे 8 जनावरे जळून खाक झाली तसेच 5 लक्ष 35 हजाराचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे 9 लक्ष 48 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुलढाणा तालुक्यातील इरला येथील शेतकरी भागवत सरोदे यांचे गावापासून अंदाजे अर्धा कि.मी.अंतरावर गट नं. 144 मध्ये सामूहिक मालकीचा गुरांचा मोठा आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे चारापाणी करुन गोठ्यामध्ये गुरे बांधलेली होती. तसेच या गोठ्यामध्ये त्यांनी शेतीपयोगी साहित्य ठेवलेले होते. सोमवार 27 मार्च रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास सरोदे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली, पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीचे मोठे भडके उडत होते, गायी-म्हैशी जिवांच्या आकांताने हंबरडा फोडत होती. आग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यामध्ये त्यांची 4 लक्ष 13 हजार किमतीची 1 म्हैस, 1 हेला, बैल 1, गोऱ्हे 2, वासरु 2, गाय 1 जळून खाक झाली आहे. तर 1 गाय व 1 बैल जखमी झाले असून भुसा, कुटार, गव्हाणी, प्लास्टीक डाले, स्पिंकलर सेट, पाईप, नोजल, मिनी स्पिंकलर, ठिंबक संच, रेन पाई, इलेक्ट्रीक मोटार पंप 2, बोअरची मोटार, पेट्रोल पप 2, फवारणी चार्जीक पंप-1, दिवाण पलंग 1, लोखंडी पलंग 1, ताडपत्री 8 नग, टिनपत्रे 90, इतर शेती औजारे , जनावरांचे खाद्य, खताचे बँग 4, सायकल, कट्टे बारदाणा असा एकूण 5 लक्ष 35 हजार रुपयांचे साहित्य जळाल्याने त्यांचे एकूण 9 लक्ष 48 हजाराचा नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आज 28 मार्च रोजी पंचनामा केला आहे. शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.