गुरुवारी मोताळ्याचा आठवडी बाजार भरणार नाही!

1253

शुक्रवार 31 मार्चला भरणार बाजार!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28 Mar.2023) मोताळा येथे गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो, परंतु यावर्षी गुरुवार 30 मार्च रोजी प्रभू श्रीराम नववी असल्यामुळे मोताळा येथील गुरुवारचा आठवडी बाजार हा शुक्रवार 31 मार्च रोजी भरणार आहे. याची नागरिक व व्यावसायीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

मोताळा येथे गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो, या बाजारामध्ये आजुबाजुच्या गावातील हजारो नागरिक तसेच शेकडो व्यावसायीक आपले दुकान थाटतात. परंतु गुरुवार 30 मार्च रोजी प्रभु रामचंद्र नववी उत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, करीता बोराखेडी पोलिस निरीक्षक यांच्या पत्रान्वये श्री राम नववी उत्सवानिमित्त आठवडी बाजार शुक्रवार 31 मार्च रोजी भरणार आहे, असे पत्र मुख्याधिकारी न.पं.मोताळा यांनी आज मंगळवार 28 मार्च रोजी जारी केले आहे.