बुलढाणा शहरात चोरट्यांनी ‘धूम स्टाईल’ने पळविले ; दोन महिलांच्या गळ्यातील एका लाखाचे दागीणे!

464

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24Apr.2023) खरचं जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलढाणा शहरात चाललं तरी काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसह महिला भगिणीकडून उपस्थित केल्या जावू लागला आहे. घटनाही तशीच आहे, मुंबई, पुणे, नागपूर शहरात जशा घटना घटतात तश्याच घटना आता बुलढाणा शहरात घडू लागल्या आहेत. शहरातील राम नगरातील तसेच भडेच ले-आऊट येथील अशा दोन महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागीणे हिसकावून नेत चोरट्यांनी ‘धूम स्टाईल’ फरार झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना पकडणे पोलिस प्रशासनासमोर एक आव्हान आहे.

विजयालक्ष्मी श्रीरंग वाघमारे (वय ६०) राम नगर बुलडाणा यांनी बुलढाणा शहर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादी दिली की त्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे घरामध्ये तृप्ती लेडीज शॉप दुकान आहे. २३ एप्रिलच्या रात्री ८ वाजेच्या त्या दुकानात असतांना दोन अज्ञात इसम काळ्या रंगाची पल्सर गाडीवर आले, त्यातील एक इसम दुकानामध्ये आला व दुसरा इसम हा गाडीवरच बाहेर थांबलेला होता. यावेळी त्यांने फेअर अ‍ॅण्ड लव्हलीची पुडी मांगितली त्याला पुडी दिली असता, त्याने ५०० रुपयाची नोट दिली असता चिल्लर नाही का विचारले असात, त्याने बाहेर गाडीजवळ थांबलेल्या इसमाला विचारले १० रुपये चिल्लर आहे का, असे विचारत दुकानात आलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची साखळी ओढळी, त्यामध्ये सोन्याच्या साखळीचे पान तुटून खाली पडले, मात्र तुटलेली ५० हजार रुपये किमतीची चैन घेवून ते दोघे गाडीवर बसून चिंचोले चौपाटीच्या दिशेने पळून गेले. बुलढाणा शहर पोस्टे.येथे येथे तक्रार करावयास आले असता साबीराबी याकुब देशमुख रा.भडेच ले-आऊट यांच्या गळ्यातून सुध्दा याच प्रकारे १० ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत ५० हजार यावर सुध्दा डल्ला मारल्याचे समजले आहे. याबाबत बुलढाणा शहर पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सखाराम सोनुने करीत आहे.

शिक्षकाची २० लाखाची कार जाळली..

शहरात आपले लाखोचे वाहने सुरक्षीत आहे काय? असा प्रश्न आता चारचाकी मालकांना पडला आहे. २३ एप्रिलच्या रात्री १.३० वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील मच्छी ले-आऊट येथे राहणारे शिक्षक सुनिल डोंगरे यांची २० लाख रुपये किमतीची महागडी कार अज्ञातांनी जाळून टाकली आहे. कार जाळतांना तिघेजण डोंगरे यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात वैâद झाले आहे.