आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

349

मोताळा तालुक्यातील धा.देशमुख येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (23.Apr.2023)बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या धा.देशमुख येथे एका 45 महिलेने वाताच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज रविवार 23 एप्रिल रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतक महिलेचे नाव आशा गजानन टाकसाळ असे आहे.

मोताळा तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील एका 45 वर्षीय महिला आशा गजानन टाकसाळ यांनी धामणगाव देशमुख शेतशिवारात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदर घटना आज 23 एप्रिल रोजी उघडकीस आली. याबाबत फिर्यादी गजानन टाकसाळ यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आशा टाकसाळ यांना वाताचा त्रास होत असल्याने त्या नेहमी चिंतेत राहत होत्या, त्या त्रासाला कंटाळून त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन धा.बढे पोस्टे.ला कलम 174 अन्वये जाफौ दाखल करण्यात आला आहे.