बुलढाणा पोलिसांची कोलवड येथे जुगारावर धाड; 1 लाख 93 हजाराचा मुद्देमाल पकडला

308

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25.Apr.2023) बुलढाणा पोलिसांनी कोलवड येथील सुर्यवंशी यांच्या शेतात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकून 5 जुगाऱ्यांकडून 1 लाख 93 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर धडक कारवाई बुलढाणा शहर पोलिसांनी 24 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास केली. आरोपींवर शहर पोस्टे.ला जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलढाणा पोलिसांनी शहरापासून जवळच असलेल्या कोलवड येथील सुर्यवंशी यांच्या शेतात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर 24 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास रेड केली. यावेळी 5 आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नगदी 2400 रुपये, तासपत्ता 20 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल 10 हजार, छोटा नोकीया कंपनीचा मोबाईल 1 हजार, दुचाकी 1 हिरो होण्डा कंपनीची 30 हजार रुपये, 1 पल्सर मोटार सायकल 60 हजार, 1 हिरो होण्डा स्पेंल्डर 30 हजार, शाईन होण्डा 60 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 93 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणाचे एएसआय.दशरथ जुमडे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हॉफीज खान इस्लाम खान पठाण, गजानन पांडुरंग जाधव, जीवन राजु जवरे, ज्ञानेश्वर सुपडा सपकाळ, अनिल जाधव सर्व रा.कोलवड यांच्यावर बुलढाणा शहर पोस्टे.ला जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम (12) a अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील तपास लेहेकॉ.कोकीळा तोमर ह्या करीत आहेत.