2024 च्या बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्रीताई शेळके ?? बॅनरबाजी व शक्ती प्रदर्शनाने राजकीय चर्चांना आले उधाण!

809

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10.May.2023) म्हणतात ना…प्रेमात, युध्दात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य आहे, मग प्रेमात एक दुजेके लिये असतांना सुध्दा आत्महत्या का होतात? युध्द हे जवळच्याच माणसात का होतात? राजकारणात आपलेच कसे गद्दार होवून काटा कसा काढतात, हे न उलगडणार एक कोडचं आहे. भाऊ खरचं शक्ती प्रदर्शनाने निवडणूक जिंकता येते का? निवडणूक तो एक दिमागवाला ‘खेल’ है, जो शेवटच्या घटिकेला इतरांचा ‘गेम’ करुन मतदार राजाला आपल्या बाजुने खेचतो तोच खरा ‘बाजीगर’ ठरतो ! सन 2024 च्या बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्रीताई शेळके, अशा चर्चांना राजकीय उधाण आले आहे.

2024 च्या विधानसभा निवडणूकीची अनेकांनी तयारी केली असल्याने मतदार संघामध्ये नेतेमंडळी तोरणा व मरणादारीचे व इतर सामाजिक, धार्मिक कार्यात दौरे वाढवून हितचिंतकांची संख्या तपासून पाहत तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडतो, कदाचीत तो प्रश्न पडणे साहजीकच आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे कामांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, यासह आदी कारणामुळे जनसंपर्क होत असतो. सहानुभूती व आनंदात सहभागी होण्यासाठी तोरणा व मरणादारी त्यांची उपस्थिती असते. माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड.जयश्रीताई शेळके, यांचा दांडगा जनसंपर्क आहे. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड यांचा अचानक तोरणा व मरणादारी वाढलेला जनसंपर्क सुध्दा काहीतरी गुपीत सांगून जातो. तर भाजपाचे साध्या सरळ स्वभावाचे योगेंद्र गोडे यांचा कमी होत चाललेला जनसंपर्क व भेटीगाठी मनाला चटका लावून जातो.

बाळासाहेबांची शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंधामुळे मतदार संघामध्ये त्यांनी करोडोंचा विकासनिधी त्यांनी खेचून आणला. सध्या भाजपा व शिवसेना युती असल्याने कदाचीत योगेंद्र गोडे साहेबांचा जनसंपर्क थंडावल्या गेल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. विजयराज शिंदे यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे सन 2019 चे मतदान पाहता ते द्वितीय क्रमांकावर होते, तेही ऐनवेळी वंचितमध्ये जावून सुध्दा..! राजेंचा जनसंपर्क व इमानदार जुना गोतावळा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, म्हणजेच राजेंचीही मतदार संघामध्ये मोठी पकड असून हवा सुध्दा आहे. आता काँग्रेसच्या ॲड.जयश्रीताई शेळके यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची महिलावर्गामध्ये मोठी पकड असून सर्वधर्मीयांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग तसेच त्याला दिशा बचतगटांच्या माध्यमातून मोठं पाठबळ मिळत आहे. घाटावर आणि घाटाखाली त्यांना मानणारा सर्वपक्षीयसमूह असून त्यात सुनिल शेळके नावाचा सुध्दा त्यांना घाटाखाली मोठा फायदा होणार आहे. परंतु टिकीट कोणी काटणार नाही, यावर कटाक्ष नजर ठेवावी लागणार आहे.

माजी आमदार हषवर्धन सपकाळ यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मोठा सहभाग असून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहे. परंतु त्यांचा मतदार संघाच्या राजकारणात पाहिजे तेवढा सक्रीय सहभाग नसल्याने त्यांना सन 2019 च्या निवडणूकीत घाटाखाली मोठा फटका बसल्याची चर्चा होती, एकंदरीत पक्षातील सहभाग व राहुल गांधी यांच्याशी असलेले संबंध पाहता त्यांचे 2024 च्या विधानसभेचे टिकीट जवळपास ‘फिक्स’च असल्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड यांचे मुकुलजी वासनीक यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेही सुध्दा टिकीट मिळण्याच्या दावेदारांमध्ये आहे. अ‍ॅड.जयश्रीताई शेळके हे सुध्दा आमदारकीच्या रेसमध्ये आहे. कदाचीत त्यांना टिकीट मिळाल्यास त्या निवडून सुध्दा येवू शकता, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु ऐनवेळी राजकारणात काहीही होवू शकते?

अ‍ॅड.जयश्रीताई शेळके आमदार होवू शकतात ?

बुलढाणा विधानसभा मतदार संघात सन 2024 च्या निवडणुकीत कदाचीत काँग्रेसकडून जयश्रीताई शेळके यांना टिकीट मिळाल्यास त्यांना सर्वधर्मीय, पक्षीय पाठींबा असल्याने व त्यांचा जनसंपर्क पाहता, त्या आमदार होवू शकतात? अशा चर्चांना त्यांच्या वाढदिवसांच्या बॅनरबाजीमुळे मोठे उधाण आले आहे!