55 हजार शिक्षकांची एकाच टप्प्यात भरतीच्या मागण्यांसाठी; सुशिक्षीत बेरोजगारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक !

318

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11.May.2023) अभियोग्यतेनंतरची लांबलेली नियुक्ती प्रक्रीया लवकर पूर्ण करुन 55 हजार शिक्षकांची एकाच टप्प्यात भरती करण्याच्या मागणीसाठी सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघ, बुलढाणा व इतर अभियोग्यता धारक उमेदावर प्रभाकर वाघमारे यांच्या नेतृत्वात आज गुरुवार 11 मे रोजी सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक देवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रीया ही मार्च 2023 मध्ये राबविली होती, त्या प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हनजेच पवित्र पोर्टल नोंदणी सरकारने अद्याप चालू केलेली नाही, राज्य सरकारच्या वित्त विभागाने 80 टक्के म्हणजेच 55,000 पद भरतीसाठी मान्यता दिली असून सदर भरती प्रक्रिया ही शिक्षण विभाग दोन टप्यात राबविनार असल्याचे मिडीयाच्या माध्यमातून निदर्शानास आले आहे. सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रिया एकाचवेळी राबविली तर सरकारचा ही दुसरी भरती प्रक्रीया राबविण्याचा वेळ वाचेल व मुलांना ही रोजगार लवकर मिळेल व पुन्हा डी.डी चालान, लायब्ररी यावर होणारा बेरोजगारांचा खर्च वाचेल, त्यामुळे एकाच वेळी 55,000 पदांची भरती प्रक्रीया राबविण्यात यावी, भरती प्रक्रीया मध्ये अंतिम निवड यादी लावतांना प्रतिक्षा यादी लावावी जेणे करुन एखाद्या उमेदवाराला दुसरीकडे संधी मिळाल्यास त्यांची जागा रिक्त न राहता प्रतिक्षा यादितील उमेदवार त्या ठिकाणी भरता येईल.निवेदनावर प्रभाकर वाघमारे, सुधाकर धुरंदर, दिलीप गवई, रामेश्वर जाधव, विनोद जाधव, कु. प्रिती हिवाळे
सुवर्णा जेऊघाले, मनिषा उबरहांडे,सिमा राठोड, मंगेश बोचरे, अक्षय लोखंडे, सागर निकम यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.