महाविकास आघाडीच्या एकनिष्ठेचा नारा; बुलढाणा बाजार समितीच्या सभापतीपदी जालिंधर बुधवत ?

406

महाविकास आघाडी गुलाल उधळणार !

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (16.May.2023) जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील महिन्यात 28 एप्रिल रोजी पार पडली होती. त्याच दिवशी मध्यरात्री उशीरा लागलेल्या निकालात 18 पैकी 12 जागा महाविकास आघाडीने तर केवळ 6 जागा भाजपाला मिळाल्या होत्या. मंगळवार 16 मे रोजी सभापतीची निवड होणार असून यामध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ असल्याने एकही उमेदवार फुटणार नसल्याने जालींधर बुधवत यांची बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चित असलेल्या बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 12 जागावर बाजी मारली. तर 8 जागावर भाजपाला समाधान मानावे लागले होते. बाराही उमेदवार मागील 8 दिवसापासून दिल्ली, गोवा या ठिकाणी सहलीवर रवाना झाले असून सहलीचा उन्हाळ्यात मनमुराद आनंद लूटत असून ते थेट मंगळवार 16 मे रोजी होणाऱ्या सभापतीपदाच्या मतदानासाठी हजर राहणार असून यामध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची सभापतीपदी वर्णी लागणार? असल्याची सुत्रांची माहिती आहे.

उमेदवारांवर तीन्ही पक्षाच्या नेत्यांची नजर

महाविकास आघाडीचे १२ उमेदवार मंगळवार 16 मे रोजी थेट बाजार समितीच्या मतदान केंद्रातच दाखल होणार आहे. त्यांच्यावार माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांची नजर असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही अभिषाचा काहीही असर पडणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष असून सर्वच उमेदवार एकनिष्ठ असल्याचे चित्र असल्याची सुत्रांची माहिती आहे.

फूट पूढील निवडणूकांसाठी घातक!

कदाचीत महाविकास आघाडीत निवडून आलेल्या उमेदवारामध्ये फूट पडल्यास महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ फुटून त्यामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसेल. यामुळे सर्वांची एकी कायम असल्यामुळे मंगळवार 16 मे रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची सभापतीपदी वर्णी लागून महाविकास आघाडीच गुलाल उधळेल, एवढे मात्र निश्चीत!