‘जय भिम..! रामराम.., आदाब’ चिठ्ठी लिहून मजूराची आत्महत्या !

372

BNU न्यूज नेटवर्क..
सोनाळा (15.May.2023) सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसह मजुरांना जिवन जगणे कठीण झाले आहे. कुटूंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करावे त्यातच अठरावविश्व दारीद्र्तेला कंटाळून सोनाळा येथील एका 55 वर्षीय मजुराने ‘जय भिम, रामराम आदाब’ अशी चिठ्ठी लिहून 14 मे रोजी विषारी औषधी प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना सोनाळा येथे उघडकीस आली. मृतक मजुराचे नाव प्रकाश गोटीराम दाभाडे असे आहे.

बकऱ्यांना चारा आणतो, असे सांगून प्रकाश दाभाडे 13 मे च्या सायंकाळी 5 वाजता घरुन निघून गेले होते. परंतु रात्री उशीरापर्यंत ते परत न आल्याने पोलिस पाटील रविंद्र वानखडे व इतर नातेवाईकांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला होता, परंतु ते आढळून आले नव्हते. 14 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह सोनाळा भाग-2 मधील रामेश्वर मानकर यांचया माळेगाव रस्त्यावरील गट क्र.616 मधील शेतात मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत ‘जय भिम, रामराव आदाब’ असा मजकूर लिहलेली चिठ्ठी आढळून आली असून गरीबीला कंटाळून आत्महत्या करीत असून कोणालाही जबाबदार धरु नये, असा मजकूर चिठ्ठीत नमूद आहे. पोलिसांनी सदर चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली असा आप्त परिवार आहे.