कोथळी येथे आगीचे भिषण तांडव; 50 टिनांचा गुरांचा गोठा जळून खाक! 7 लाखाचे नुकसान !!

1369

सुदैवाने जिवीतहानी टळली; सर्व्हे करुन मदत देण्याची मागणी

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19.May.2023)कधी कोरडा, कधी ओला तर कधी अवकाळी पाऊस हे संकटे शेतकऱ्यांच्या पाचीलाच पुंजलेली आहेत. यामध्ये शॉटसर्कीट, आग लागून गुरांचे गोठे जळण्याचे प्रकार वाढल्याने जगाचा पोशींदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत आहे. 19 मे रात्री 2 वाजेच्या सुमारास मोताळा तालुक्यातील कोथळी येथील भागवत मधूकर भुसारी यांच्या गट नं.3 मध्ये असलेल्या गुरांच्या गोठ्याला आग लागली, आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे 2 बैल भाजून गंभीर जखमी झाले असून गोठ्यात ठेवलेले 6 एकरातील ठिबक, स्प्रिंकलर व इतर शेतीपयोगी साहित्य असे एकूण जवळपास 7 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने आग गावकऱ्यांनी वेळीच आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील भागवत भुसारी यांचा जिल्हा परिषद शाळा इब्राहिमपूर गट नं.3 मध्ये गुरांचा गोठा आहे. भुसारी हे नेहमीप्रमाणे गुरांना चारापाणी करुन नित्यनियमाप्रमाणे त्यांनी 18 मे सायंकाळी ते घरी गेले. त्यानंतर 19 मे रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली, आगीने पाहतापाहता रौद्ररुप धारण केले. बाजुला शेतात नांगरटी करणाऱ्या लोकांनी सदर घटनेची माहिती पोलिस पाटील व भागवत भुसारी यांना दिली. आगीचे प्रचंड भडके उडत होते, यावेळी जिवाच्या आकांताने हंबरडा फोडीत होते. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी सुनिल गोंड यांनी रात्रीच्या सुमारास कार्यत्पपरता दाखवित पाण्याचे 2 टॅक्टर आणले, परंतु आग मोठी असल्याने जवळपास 2 तासांच्या गावकऱ्यांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणल्या गेली.
त्यापर्यत भागवत भुसारी यांच्या 50 टिनांच्या गुरांचा गोठा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. गोठ्या बांधलेले 5 जनावरापैकी 2 बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले असून 3 गायी सुध्दा जखमी झाल्या आहेत.

7 लाखाचे शेतीपयोगी साहित्य अग्नीच्या भक्ष्यस्थानी

गोठ्यात भुसारी यांचे 6 एकरातील ठिबकसंच, स्प्रिंकलर 1 सेट, नागर, तिफन, छकडे, 5 ते 6 ट्राली कुटी व कुटार जळून खाक झाले. आगीच्या भडक्याने आजुबाजुचे 10 निंबनचे झाडे सुध्दा होरपळी आहे, सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यामध्ये भुसारी यांचे जवळपास 5 ते 7 लाखांचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदर नुकसानीचा सर्व्हे करुन शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.