अंत्री येथे 22 वर्षीय युवकाची आत्महत्या

670

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19.May.2023) मोताळा तालुक्यातील अंत्री येथे एका 22 वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 19 मे रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली. मृतकाचे नाव वैभव शांताराम बुंदे असे आहे.

आत्माराम बुंदे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते आज 19 मे रोजी सकाळी शेतमजुरीचे कामावर जात असतांना त्यांना माहिती मिळाली की, त्यांचा पुतण्या वैभव बुंदे याने अंत्री शिवारातील गोविंदा साबे यांच्या शेतातील बेहड्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता त्यांना त्यांचा पुतण्या वैभव बुंदे हा साबे यांच्या शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अश्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली. वैभव बुंदेवर आज सायंकाळी 5.45 वाजता अंत्री येथे शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव हा पुणे येथून एका महिन्यापुर्वी गावी आल्याचे समजते. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई-वडिल, 1 भाऊ, आजी असा आप्त परिवार आहे.