त्याने वेळोवेळी तिच्या शरीराचे लचके तोडले; ती ही सहन करीत गेली, त्याला कुठं माहीत ? ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती !

798

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (20.May.2023) म्हणतात ना, माणसाला जीवन एकदाच मिळते, प्रत्यकाने त्या जीवनाचे सार्थक करावे. परंतु काही लिंगपिसाट नराधमांच्या डोळ्यात फक्त वासनाच भरलेली असते! तो स्त्रीला उपभोग्य वस्तूच मानीत गोरगरीब विधवा व गरजु महिलांना हेरुन त्यांचे शासकीय कार्यालयातील अडलेले कामे करुन देण्याच्या बहाण्याने जवळीक साधीत त्यांच्यावर वेळोवेळी तो अत्याचार सुध्दा करतो. याची सहसा कोणी वाच्यता करीत नाही, घरच्या इज्जतीमुळे…! अश्याच एका नराधमाने त्यावेळी 23 ते 24 वर्ष वय असलेल्या विधवा मुलीशी जवळीक साधीत तिच्यावर अत्याचार केले, पण त्याला कुठं माहित ती एचआयव्ही पॉझिटीव्ह होती, म्हणजेच तो कायद्याच्या कचाट्यातून वाचला, परंतु निसर्गाने त्याला त्याच्या कर्माची शिक्षा तर दिली नाही ना? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतो.

महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेतेसाठी शासनाने शेकडो कायदे केले आहेत, परंतु त्या कायद्याचे अस्तीत्व फक्त ‘कागदारच’असल्याने महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आठ ते दहा दिवसापुर्वी एका गिधाड वासनांध युवकाने एका निष्पाप 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिला जिवानीशी ठार मारले, हा उघडकीस आलेला गुन्हा आहे. त्या आरोपीला शिक्षा सुध्दा होईल. परंतु असे कित्येक गिधाड वासनांध शासकीय कार्यालय, यासह आदी विविध ठिकाणी महिलांना त्यांचे कामे करुन देण्याच्या बहाण्याने जवळीक साधतात, या अमिषाला काही महिला बळी पडून नंतर त्यांच्या जाळ्यात अडकतात, आणि तो मग त्या महिलांवर वेळोवेळी अत्याचार सुध्दा करतो, याचे कुठेही वाच्यता सुध्दा होत नाही की, गुन्हा दाखल करण्यात येत नाही.

अशीच एक घटना महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी काही वर्षापुर्वी घडली आहे, ती एका सुत्राने ‘बुलडाणा न्यूज अपडेश’शी बोलतांना कथन केली. एका मुलीचे लग्न जेमतेम 15 वर्षी झाले असेल, त्यावेळी नवरा मुलाचे वय अंदाजे 27 वर्ष असेल, मुलगा एका मोठा शहरात कामावर असल्याने बारा ते 13 वर्षापुर्वी लग्न करुन दिले. लग्नात मुलीला काहीच समजत नव्हते. मुलीचे वय 15 वर्ष असल्याने तिच्या शरीराचा पाहिजे तसा विकास झाला नव्हता. आणि बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा सुध्दा होता, पंरतु आई-वडिलांनी लग्न जुळविले, ते त्या मुलीच्या समजण्यापलिकडे होते, तिच्या वयामानानुसार ते दिवस तीचे शाळेत जाण्याचे होते, शाळा शिकली असतीतर कदाचीत लग्नाच्यावेळी ती फक्त 9 वीत असती, त्यावेळी लग्न होवून ती केवळ 16 वर्षी आई सुध्दा बनली होती.

आजही त्या मुलीचा चेहरा पाहून वाटत नाही, की तीला 2 मुले असून ती वयाच्या 23 वर्षी विधवा झाली. आणि मग विधवांना काही योजनांचा लाभ मिळतो काय, यासाठी शासकीय कार्यालयाचे चक्कर मारीत असतांना तिच्यावर एका वासनांध गिधाडाची नजर पडली, अन् त्या दलालाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला जाळ्यात ओढून विधवांसाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. तिच्या नवऱ्याचा एड्सने मृत्यू झाल्याने तिला सुध्दा तिच्या नवऱ्यापासून त्या रोगाची लागण झाली होती, हे त्या वासनांध नराधमाला कुठे माहिती होते, कदाचीत त्या नराधमाची बायको व मुले-बाळे असतील तर त्यात त्यांचा काय दोष, परंतु त्याला कुठे माहित ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. ती महिला नेहमी गोळ्या घेत आहे. परंतु कदाचीत त्या नराधमाला त्या रोगाची लागण झाली असेल तर त्याला त्याचा पापाची शिक्षा निसर्गाच्या नियमाने दिली सुध्दा असेल, परंतु त्याच्या बायको व मुलांचा काय गुन्हा? हा प्रश्न मनाला आजही स्वस्त बसू देत नाही !

आजही असे शेकडो वासनांध गिधाड  मोकाट फिरतात !

नवरा शहरात राहणारा होता, त्याच्याकडे पैसा अडका खूप होता, परंतु तो लहान पणापासूनच एका मोठ्या शहरात असल्याने त्याला बायांचा मोठा नांद होता, कदाचीत त्यावेळी त्या मुलीच्या आई-वडिलांनी तो नात्यातील आहे का, तो किती पैसा कमावितो, यापेक्षा त्याची जर एचआयव्ही टेस्ट केली असतीतर कदाचीत आज ती मुलगी 23 व्या वर्षी विधवा झाली नसती. त्याच विधवा मुलीवर एका नराधमाने शासकीय असलेल्या योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी जवळील साधीत तिला आपल्या बाहुपाश्यात अकडवून तीच्या शरीराचे वेळोवेळी लचके तोडले नसते. असे कित्येक वासनांध गिधाड आजही मोकाट फिरत आहेत.