योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस बुलढाणा विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्यदायी ठरणार !

303

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (20.May.2023) भाजपा नेते योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रमांनी मोठा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यावर्षी सुध्दा गुरुवार २५ मे रोजी त्यांचा वाढदिवस बुलढाणा विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी आरोग्यदायी ठरणार आहे.

वाढदिवसाला मोताळा तालुका भाजपाच्या वतीने नागरिकांसाठी एक वर्षाकरिता मोफत आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. सदर आरोग्य कार्ड धारकांना येणाऱ्या वर्षभरात या कार्डावर विविध आजारांवर संपूर्ण उपचार विनामूल्य होणार आहे. यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मोताळा तालुका भाजपा अध्यक्ष यशवंतराव पाटील यांनी केले आहे. याकरिता २२ मे पर्यंत नाव नोंदणी अनिवार्य आहे.

नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन..

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी नागरिकांनी प्रविण जवरे मो.9922765076, विशाल व्यवहार मो.8766410421, डॉ.वैभव इंगळे मो.8698259856, राजेश आढाव मो.9850424401, दत्ता घनोकार मो.9657082651, सुनिल भंगाळे मो.9404031656, स्वप्नील ठोंबरे मो.7709460624, निलेश मऱ्हे मो.8668381473, विकास नागवे मो.9765915055, भैय्या पाटील9730803430 या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपाचे प्रविण जवरे यांनी केले आहे.